आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानमस्कार दिव्य मराठीच्या मॉर्निंग न्यूज ब्रिफमध्ये आपलं स्वागत. आज शुक्रवार 3 फेब्रुवारी असून माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी......
पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी
नाशिक पदवीधर निवडणुकीत तांबेंचा दणदणीत विजय
नाशिक पदवीधर मतदार संघामध्ये चर्चेत असलेल्या अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीचा पाठिंबा असलेल्या शुभांगी पाटील यांचा दारुण पराभव झाला आहे. तर औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाचा अंतिम निकाल हाती आला आहे. त्यामध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काळे यांनी चौथ्यांदा विजयाचा गुलाल उधळला आहे. काल विधान परिषदेच्या 5 जागांच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. वाचा सविस्तर
अदानी प्रकरणावर RBI कडून मोठे आदेश
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील सर्व बँकांना सूचना जारी करत अदानी समूहाला दिलेल्या कर्जाची माहिती मागवली आहे. अदानी एंटरप्रायझेसने 20 हजार कोटींचा एफपीओ मागे घेण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. तसेच त्यांनी गुंतवणूकदारांची रक्कम परत करणार असल्याचे देखील सांगितले. तर दुसरीकडे काल लोकसभा आणि राज्यसभेत देखील याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात आली. यामुळे आता अदानी समुहाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर
अर्थसंकल्प जाहीर होताच सोने ऑलटाइम हाय
नुकताच केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर झाला. यामध्ये सोन्या-चांदीचे दर आणखी महाग होणार असल्याचे सांगण्यात आले. यानंतर काल बुलियन्सच्या वेबसाईटवर जारी करण्यात आलेल्या दरांनुसार, सोने 779 रुपयांच्या वाढीनंतर 58 हजार 689 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचलेय. तर चांदीच्या दरांमध्ये देखील वाढ झाली असून चांदी 71 हजार 250 किलोग्रॅमवर पोहोचली आहे. दरम्यान, सोन्याने प्रथमच सार्वकालिक उच्चांक गाठला आहे. वाचा सविस्तर
नेपाळहून दोन शालिग्राम शिळा अयोध्येत दाखल
373 किलोमीटर आणि 7 दिवसांच्या प्रवासानंतर नेपाळहून दोन विशाल शालिग्राम शिळा अयोध्येत दाखल झाल्या आहेत. या शिळा अयोध्येत दाखल होताच लोकांनी पुष्पवृष्टी करत उत्सवी वातावरणात स्वागत केले. यावेळी जय श्री रामचा जयघोष देखील झाला. तसेच भाविकांनी मोठी गर्दी केली होती. या शिळा 6 कोटी वर्षे जुन्या असल्याचे सांगण्यात येत आहे. वाचा सविस्तर
विराटने केले गिलचे कौतुक
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 मालिकेतील शेवटच्या सामन्यात युवा सलामीवीर शुभमन गिलने नाबाद 126 धावांची खेळी केली. गिलला त्याच्या या शानदार कामगिरीसाठी सामनावीर पुरस्कार देण्यात आला. यानंतर माजी कर्णधार विराट कोहलीने देखील गिलला इंस्टाग्रामवर शुभेच्छा देत अभिनंदन केले. त्याने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीद्वारे गिलचे भविष्यातील स्टार असे वर्णन केले. वाचा सविस्तर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.