आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानमस्कार दिव्य मराठीच्या मॉर्निंग न्यूज ब्रिफमध्ये आपले स्वागत. आज गुरुवार 2 मार्च फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी.
पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाकडे 47 धावांची आघाडी
भारत-ऑस्ट्रेलिया तिसर्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय संघ अवघ्या अडीच तासांत 109 धावात आटोपला. हा सामना ऑस्ट्रेलियाच्या नावावर राहिला आहे. इंदूरच्या होळकर स्टेडियमवर पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 47 धावांची आघाडी घेतली. पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाच्या फिरकीपटूंसमोर भारतीय फलंदाज हतबल दिसत होते. विशेष म्हणजे भारताचे पाच फलंदाज दुहेरी आकडा पार करू शकले नाहीत. वाचा सविस्तर
सत्तासंघर्षावर आज निर्णायक सुनावणी
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील कालची सुनावणी झाली. यावर आज पुन्हा सुनावणी होणार आहे. सध्या ही सुनावणी अंतिम टप्प्यात आली असून, याच आठवड्यात सर्वोच्च न्यायालयातील युक्तिवाद आणि सुनावणी पूर्ण होणार आहे. तसेच याच आठवड्यात हे प्रकरण संपवायचे आहे. असे महत्त्वपूर्ण वक्तव्य कालच्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केले आहे. वाचा सविस्तर
राऊतांच्या वक्तव्यानंतर दोन्ही सभागृहात गोंधळ
संजय राऊत यांच्या चोरमंडळ या वक्तव्याचे काल विधानसभेत जोरदार प्रतिसाद उमटले. शिवसेना आणि भाजपच्या आमदारांनी हक्कभंग आणण्याची मागणी केली. वाढत्या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले. तसेच राऊत यांना अटक करा अशी मागणी भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी विधानपरिषदेत केली आहे. तर राऊतांचे वक्तव्य हे महाराष्ट्राचा अपमान असून विधानसभा अध्यक्षांकडून चौकशीची घोषणा करण्यात आली. वाचा सविस्तर
सिसोदिया-जैन यांची जागा घेणार आतिशी, भारद्वाज
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांनी राजीनामा दिला. त्यानंतर आमदार आतिशी मार्लेना आणि सौरभ भारद्वाज हे दिल्ली सरकारच्या मंत्रिमंडळात मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांची जागा घेणार असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दोघांचीही नावे राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठवली आहेत. वाचा सविस्तर
G 20 पाहुण्यांनी घेतला निरोप
G-20 वाचा सविस्तर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.