आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कैदी लकडावालाची गांधीगिरी:मच्छरदाणीच्या मागणीसाठी कोर्टात नेली डासांची बाटली

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईतील तळोजा कारागृहात कैद गँगस्टर एजाज लकडावाला याला कारागृहात मच्छरदाणी हवी होती. त्यासाठी तो कोर्टात मृत डास भरलेली बाटली घेऊन पोहोचला. त्यानंतरही सत्र न्यायालयाने त्याची मच्छरदाणीची मागणी फेटाळून लावली. तथापि, कोर्टाने त्याला कारागृहात ओडोमास किंवा इतर डास पळवणाऱ्या औषधींचा वापर करण्याची परवानगी दिली.

गुरुवारी लकडावाला यास कोर्टात हजर करण्यात आले होते. तेव्हा त्याने न्यायाधीशांकडे डासा खूप चावतात, असे सांगत सोबत नेलेली मृत डास भरलेली बाटली न्यायाधीशांना दाखवली. दाऊद इब्राहिमचा माजी सहकारी असलेल्या लकडावालाने असेही सांगितले की, २०२० मध्ये त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवले गेले तेव्हा मच्छरदाणी देण्यात आली होती. पण या वर्षी कारागृह अधिकाऱ्यांनी सुरक्षेचे कारण देत ती जप्त केली आहे. त्याने यापूर्वीही कोर्टाकडे अर्ज करून मच्छरदाणी वापरण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. लकडावाला यास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यासह (मोक्का) विविध गुन्हेगारी प्रकरणांत जानेवारी २०२० मध्ये अटक करण्यात आली होती.

अनेकांना मच्छरदाणी वापरण्याची परवानगी मिळाली नाही गँगस्टर डी. के राव यास न्यायालयाने मच्छरदाणी वापरण्यास परवानगी दिली होती. दुसऱ्या एका न्यायालयाने ढलगार परिषद-माओवाद्यांशी संबंधित प्रकरणात काही आरोपींना मच्छरदाणी वापरण्याची न्यायालयाने परवानगी मिळाली नव्हती. कारागृह अधिकाऱ्यांना डास रोखण्यासाठी उपाय करण्याचे कोर्टाने निर्देश दिले होते. माओवाद्यांशी संबंधित अटकेतील सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा यांनीही अर्ज दाखल करून मच्छरदाणी देण्याची मागणी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...