आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सासूने टीव्ही बंद केला, सून संतापली:हाताची 3 बोट छाटली,  पतीच्याही कानशिलात लगावली

मुंबई22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईच्या अंबरनाथमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सासूने टीव्ही बंद केला म्हणून सुनेने सासूबाईंची चक्क तीन बोटे छाटून टाकली. तर पतीच्याही कानशिलात लगावली. याप्रकरणी सासूने शिवाजी नगर पोलिस ठाण्यात सुनेविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

सासू-सुनेमधील नाते हे कायम वादातीत असते. प्रत्येक घरात छोट्यामोठ्या कुरबुरी-भांडणे होतच असतात. त्यातल्या त्यात सासू सुनांमध्ये कायम शीतयुद्ध सुरू असते. मात्र, ठाण्याच्या अंबरनाथ येथे सुनेने भांडणाची मर्यादा ओलांडत सासूवर वार केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सासूने टीव्ही बंद केला. या गोष्टीचा राग आलेल्या सुनेने त्यांच्या हाताची तीन बोटेच कापून टाकली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

अशी घडली घटना

अंबर येथे सोमवारी (दि. 5) ही घटना घडली. या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, 60 वयवर्ष असलेल्या सासूबाई या घरात पूजा करण्यात मग्न होत्या. यावेळी त्या भजनही गात होत्या. मात्र, यावेळी 32 वर्षीय सून घरात मोठ्या आवाजात टीव्ही पाहत बसली होती. पूजा करताना मोठा आवाज येत असल्याने सासूने सुनेला टीव्ही बंद करण्यास सांगितले. मात्र सूनेने त्याकडे दुर्लक्ष केले. यानंतर सासूने आवाज कमी करण्याची देखील विनंती केली. मात्र काहीही परिणाम होत नसल्याचे पाहून त्यांनी स्वत: उठून टीव्ही बंद केला.

पतीलाही मारहाण

सासूने टीव्ही बंद केल्याचे पाहताच सून संतापली आणि तिने धारदार शस्त्राने हल्ला करत सासूच्या हाताची बोटे कापून टाकली. हा वाद पाहून महिलेचा पती दोघींमध्ये पडला. मात्र, पत्नीने त्यालाही मारहाण केली.

बातम्या आणखी आहेत...