आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Mother India Is Not A Widow, You Should Plant An Ant First! Sambhaji Bhide's Controversial Statement While Talking To A Female Journalist

भारत माता विधवा नाही, तू कुंकू लाव मग तुझ्याशी बोलतो:महिला पत्रकाराशी बोलताना संभाजी भिडेंचे वादग्रस्त विधान; महिलांचा तीव्र आक्षेप

मुंबई24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘शिवप्रतिष्ठान’चे संस्थापक संभाजी भिडे यांचे आज एक विधान चांगलेच चर्चेत आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांनी मंत्रालयात जाऊन भेट घेतली. यावेळी महिला पत्रकारने विचारलेल्या प्रश्नावर बोलताना त्यांनी भारत माता विधवा नाही, त्यामुळे तू आधी कुंकू लाव, मग मी तुझ्याशी बोलतो असे वादग्रस्त विधान त्यांनी आज केले.

संभाजी भिडे आज मंत्रालयात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी एका महिला पत्रकाराने मुख्यमंत्र्यांच्या भेटीबाबत प्रश्न विचारला असता, “तू आधी कुंकू किंवा टिकली लाव, तरच तुझ्याशी बोलेन. प्रत्येक स्त्री ही भारत मातेचे रुप आहे. भारत माता विधवा नाही”, असे वादग्रस्त विधान त्यांनी केले.

भिडेंच्या वक्तव्याचा निषेध- यशोमती ठाकूर

माजी महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या या वक्तव्यावर महिला संघटनांनी जोरदार टीका करत निषेध व्यक्त केला आहे. भिडे यांच्या या भूमिकेचा तीव्र शब्दात निषेध करते. पुरोगामी महाराष्ट्राच्या भूमीत असे प्रकार कदापी सहन न होणारे आहेत. सध्या माध्यमकर्मी आणि पत्रकारांना सातत्याने अपमानाला सामोरे जावे लागत आहे, हे निषेधार्ह आहे.

महिलांचा अपमान - रश्मी पुराणिक

वरिष्ठ पत्रकार रश्मी पुराणिक यांनी सांगितले की, “संभाजी भिडे यांनी महिला पत्रकार अपमान केला. सामच्या महिला रुपाली बडवे हि आज संभाजी भिडे यांना आर्थिक व्यवहाराचा प्रश्न विचारल्यावर भिडे म्हणाले तू टिकली लावणे मगशी बोलेन.” टिकली लाव तरच तूझ्याशी बोलतो. मुळातः टिकली हे सौंदर्यसाधन आहे. त्याशिवाय तिला टिकली एवढीही किंमत नाही.

दीपा कदम यांचीही टीका

महिलांसाठी शाळा, केशवपन, विधवा विवाह सारख्या गोष्टींची सुरूवात ज्या पुरोगामी महाराष्ट्रात झाली तिथे टिकलीवरून एखाद्या महिलेचा अपमान करणे हे निषेधार्ह आहे. या शब्दांत पत्रकार दीपा कदम यांनी संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावर जोरदार टीका केली आहे.

ती भेट सदिच्छेसाठी

वेगवेगळी वक्तव्य आणि भूमिकांवरून नेहमीच वादात राहणारे संभाजी भिडेंनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. मुख्यमंत्री झाल्यापासून मी त्यांची भेट घेतली नव्हती. त्यामुळे ही सदिच्छा भेट देण्यासाठी आलो आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी त्यांनी माध्यमांना दिली. संभाजी भिडे मंत्रालयात आले त्यावेळी त्यांच्यासोबत उद्योग मंत्री उदय सामंत हेदेखील उपस्थित होते. या भेटीनंतर आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले.

बातम्या आणखी आहेत...