आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय:काँग्रेसमध्ये बदलांच्या हालचाली; राज्यातील दोन मंत्र्यांना डच्चू ?

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले शुक्रवारी तातडीने दिल्लीला गेल्याचे समजते. पक्षात लवकरच केंद्रीय पातळीवर मोठे फेरबदल होणार असून हालचालींना वेग आला आहे. राज्यातील काँग्रेसच्या दोन मंत्र्यांना वगळले जाणार आहे.

काँग्रेस पक्षात सध्या फेररचनेचे वारे वाहत आहेत. पक्षाच्या केंद्रीय पातळीवर मोठे बदल होणार आहेत. त्याबरोबरच राज्यातही बदल अपेक्षित आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसच्या वाट्यास १२ मंत्रिपदे आली आहेत. पैकी दोन मंत्र्यांना योग्य परफाॅर्मन्स नसल्यामुळे लवकरच वगळले जाणार आहे. त्यातील एक मंत्री मुंबईतील आहेत. रिक्त जागेवर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. तसेच विधानसभा अध्यक्षपदही लवकर भरण्याचा काँग्रेसचा पवार आणि ठाकरे यांच्याकडे आग्रह आहे.

काँग्रेसला सबुरीचा सल्ला
पवार आणि ठाकरे यांनी काँग्रेसला थाेडे थांबा, असे सांगितल्याचे समजते. तिन्ही पक्षांतील रिक्त मंत्रिपदे एकत्रित भरण्याचा आघाडी सरकारचा विचार आहे. त्याच वेळी विशेष अधिवेशन घेऊन विधानसभा अध्यक्षाची निवड होऊ शकते, असे काँग्रेसमधील सूत्रांचे म्हणणे आहे.

बातम्या आणखी आहेत...