आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कंगना शिवसेना वाद:मूव्ही माफिया आदित्य यांच्या जवळचे, कंगनाचा पुन्हा प्रहार; 4 दिवसांच्या दाैऱ्यानंतर हिमाचलला रवाना

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बेकायदा बांधकामे तुटलेल्या सामान्यांनाही राज्यपालांनी भेटावे : महसूलमंत्री परब

मूव्ही माफिया, सुशांतसिंह राजपूतचे मारेकरी आणि त्यांच्या अमली पदार्थांच्या रॅकेटचा मी पर्दाफाश केला. ही सगळी मंडळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य यांच्यासोबत असतात, असा सनसनाटी आरोप वादग्रस्त अभिनेत्री कंगना रनौतने सोमवारी केला. चार दिवसांच्या मुंबई दौऱ्यानंतर सोमवारी कंगना हिमाचल प्रदेशला परतली.

मुंबई सोडण्यापूर्वी कंगनाने सोशल मीडियावर लिहिले, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सूडबुद्धीने माझ्यावर कारवाई करत आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची मूळ समस्या अशी की, मूव्ही माफिया, सुशांतसिंह राजपूतचे मारेकरी आणि त्यांच्या अमली पदार्थांच्या रॅकेटचा मी पर्दाफाश केला. ही सगळी मंडळी आदित्य ठाकरे यांच्यासोबत असतात. त्यामुळे हा माझा मोठा अपराध आहे. म्हणूनच माझा बंदोबस्त करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. ठीक आहे. आता बघू कोण कुणाचा बंदोबस्त करतो.”

बेकायदा बांधकामे तुटलेल्या सामान्यांनाही राज्यपालांनी भेटावे : महसूलमंत्री परब

बेकायदा कामे करणाऱ्यांना राज्यपाल भेटत असतील तर फक्त कंगनाला का भेटावे? बेकायदा बांधकामे तुटलेल्या सामान्य लोकांनाही त्यांनी भेटावे, असा सल्ला परिवहन मंत्री अनिल परब यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिला.