आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिनेमागृहे 100 टक्के क्षमतेने सुरु करा:50 टक्के क्षमतेनं सिनेमागृहे सुरु करणे आर्थिकदृष्ट्या कलाकारांना न परवडणारे, खासदार अमोल कोल्हे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून नाट्य आणि सिनेमागृहे मोठ्या प्रमाणात बंदच होती. मात्र आता ठाकरे सरकारने राज्यात येत्या 22 ऑक्टोबरपासून नाट्य आणि सिनेमागृहे 50 टक्के क्षमतेने सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी भाष्य केले आहे. नाट्यगृहे आणि सिनेमागृहे यांना 100 टक्के खुली करण्यास परवानगी द्यावी. अशी मागणी कोल्हे यांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र देखील लिहलं आहे. सिनेमागृहे 100 टक्के क्षमतेने सुरु करा. अशी मागणी त्यात करण्यात आली आहे.

येत्या 21 ऑक्टोबरपासून राज्यात 50 टक्के क्षमतेने नाट्यगृहे व सिनेमागृहे सुरु होणार आहे. त्याला राज्य सरकारने परवानगी देखील दिली आहे. मात्र हा निर्णय मागे घेऊन राज्यातील सिनेमागृहे 100 टक्के क्षमतेने सुरु करून, कलाकारांना दिलासा द्यावा. 50 टक्के क्षमतेनं सिनेमागृहे सुरु करणे आर्थिकदृष्ट्या कलाकारांना न परवडणारे आहे, कलाकारांची आर्थिक स्थिती लक्षात घेता 100 टक्के क्षमतेनं थिएटर सुरु करा, अशी मागणी अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. 50 टक्के आसनक्षमतेनं थिएटर्स सुरु करण्याचा निर्णय व्यवसायाच्या मुळावर घाव घालणारा आहे. असेही कोल्हे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...