आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काल ताई होते, आज बाई झाले:भावना गवळींचा उद्धव ठाकरेंवर पलटवार; म्हणाल्या - उद्धव यांना नैराश्याने ग्रासले

3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माझ्याबद्दल जे उद्गार उद्धव ठाकरेंनी काढले त्यामुळे मला खूप वाईट वाटले. काल मी त्यांची ताई होते, आज बाई झाले. आज बाई म्हणून त्यांनी माझा उल्लेख केला. याचे मला खूप दुःख झाले. त्यांच्या या बोलण्यामुळे वेदना झाल्या आहेत, या शब्दात बंडखोर शिवसेना नेत्या भावना गवळी यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे. उद्धव ठाकरे नैराश्यातून अशी विधाने करत असल्याचा आरोपही भावना गवळी यांनी केला.

मागील अनेक वर्षांपासून मी माझ्या मतदार संघातील एक लाखा पेक्षा जास्त बांधवाना राख्या पाठवते. या आधीही मी अनेक मंत्री , माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनाही राखी बांधली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ते मुख्यमंत्री होते तेव्हापासून मी राखी बांधते. मी अहमदाबादमध्येही त्यांची भेट घेतली होती. मी सातत्याने त्यांना राखी बांधत आले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संकटकाळात मदत केली. म्हणून मी त्यांना साथ दिली. तसंच जे रक्षाबंधनचे पवित्र नाते आहे त्या बंधाचा सन्मान सगळ्यांनी केला पाहिजे. मी नवीन असे काहीही केले नाही. बहीणीवर राग काढू नये, अशी माझी विनंती आहे. हे पवित्र नाते आहे. राजकारणात राग काढायला अनेक जागा आहेत. रक्षाबंधनसारख्या पवित्र नात्याचे कुणीही राजकारण करू नये. हे भावाबहीणीचे नाते आहे. ते असेच पवित्र ठेवूयात, असे आवाहन भावना गवळी यांनी केले.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
शिवसेनेच्या गटप्रमुखांचा बुधवारी मुंबईत मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना "मला पंतप्रधानांचं आश्चर्य वाटतं. स्वतःच्या पक्षातील माणसांनी ज्या महिला खासदारावर आरोप केले, भ्रष्टाचारी म्हणून संबोधलं, तुम्हाला सव्वा काय दीड कोटी जनतेतून हीच बहिण मिळाली राखी बांधायला?" असे म्हणत उद्धव ठाकरेंनी भावना गवळींवर निशाणा साधला होता. त्याला आज भावना गवळी यांनी उत्तर दिलं आहे. भावना गवळी यांनी काही दिवसांपूर्वी रक्षाबंधनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींना राखी बांधली होती. त्याच गोष्टीवरुन उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला होता.

बातम्या आणखी आहेत...