आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवारांचे तोंडभरुन कौतूक:खासदार बृजभूषण सिंह म्हणाले - ते मोठ्या मनाचे नेते, त्यांनी लगेच माफी मागितली असती

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शरद पवार हे मोठ्या मनाचे नेते, या शब्दात भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी राष्ट्रवादी प्रमुखांचे तोंडभरुन कौतूक केले आहे. पवार बडे दिलवाले है, त्यांच्यावर जर हे प्रकरण असतं तर त्यांनी लगेच माफी मागितली असती, असे खासदार बृजभूषण यांनी म्हटले.

गेल्या काही दिवसांपासून मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या दौऱ्यावरून वातावरण तापले आहे. बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध दर्शवला आहे. उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय राज ठाकरेंना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही, अशी भूमिका भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी घेतली आहे.

खासदार बृजभूषण पुढे म्हणाले की, मनसे प्रमुख राज ठाकरे मोदींची माफी मागितल्यास आयोध्येत येऊ शकतात. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कमीत-कमी पंतप्रधान नरेंद्र मोदींची माफी मागावी. तसेच पुन्हा कधीच उत्तर भारतीयांना आणि दक्षिण भारतीयांमध्ये भेदभाव करणार नाही, असे आश्वासन द्यावे.

खासदार बृजभूषण सिंह यांच्या भूमिकेवर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली होती. खासदार बृजभूषण सिंह यांची भूमिका राज ठाकरेंविरोधात आहे. उत्तर भारतीयांच्या भावना दुखावल्याने त्यांनी ही भूमिका घेतली. बृजभूषण सिंह यांचा वाद महाराष्ट्राविरोधात नाही, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले होते.

राज ठाकरे 5 जूनला अयोध्या दौऱ्यावर
मनसे अध्यक्ष राज ठाकरे 5 जून रोजी आपल्या पक्षाच्या नेत्यांसह अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. 5 जून रोजी राज ठाकरेंचा पहिला कार्यक्रम यूपीची राजधानी लखनऊमध्ये होणार आहे. राज ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेणार आहेत. अयोध्या दौऱ्यासाठी महाराष्ट्रातील विविध शहरांतून मनसे कार्यकर्ते अयोध्येला पाठवण्याची तयारी सुरू आहे. यासाठी 11 ट्रेनचे बुकिंग करण्यात येत आहे.तसेच शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे अयोध्येला जाणार आहेत. हे त्यामुळे राज्यातील नेत्यांचे अयोध्या दौरे सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

बातम्या आणखी आहेत...