आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्धव ठाकरे गटाला धक्‍का:खासदार गजानन कीर्तिकर एकनाथ शिंदे गटात सामील

मुंबई5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक मोठा बसला असून खासदार गजानन कीर्तिकरांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात केला प्रवेश केला आहे. शिंदे गटात जाण्यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्र्यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. तिथे त्यांचा यथोचित सत्कारही करण्यात आला.

माहीम विधानसभा मतदारसंघाचा राहुल शेवाळे आणि सदा सरवणकर यांच्यातर्फे आयोजित कार्यक्रमात खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत कीर्तिकर आज रवींद्र नाट्यमंदिर येथे आयोजित कार्यक्रमात उपस्थित होते. तेथेच हा प्रवेश पार पडला. संजय राऊत कारागृहामधून बाहेर येऊन जेमतेम दोन दिवसही झाले नाहीत तर आज ठाकरे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हात धरला. शिवतीर्थावर बोलताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर युती करून चूकच केली होती. आता पुन्हा चूक नको, असा सल्ला कीर्तिकर यांनी उद्धव ठाकरे यांना दिला होता. तेव्हापासूनच कीर्तिकर शिंदे गटात जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. याआधी ६ सप्टेंबरच्या मध्यरात्री गजानन कीर्तिकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एक गुप्त भेट झाल्याचीही चर्चा होती. जुलै महिन्यात एकनाथ शिंदे यांनी गजानन कीर्तिकर यांची भेट घेतली होती. दरम्यान, कीर्तिकर यांचे चिरंजीव अमोल सध्या शिवसेनेतच आहेत.

बातम्या आणखी आहेत...