आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'जलसा'वरील सुरक्षा वाढवली:खासदार जया बच्चन यांना मुंबई पोलिसांकडून संरक्षण, बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणावर संसदेत केले होते भाष्य

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जया बच्चन म्हणाल्या होत्या की काही लोकांमुळे आपण संपूर्ण इंडस्ट्रीची प्रतिमा खराब करू शकत नाही.

बॉलिवूडमधील ड्रग्जच्या वादानंतर जेष्ठ अभिनेत्री जया बच्चन या बॉलिवूडच्या बचावासाठी मैदानात उतरल्या आहेत. मंगळवारी संसदेत त्यांनी बॉलिवूडचा बचाव करत बॉलिवूडला बदनाम करणाऱ्यांना चांगलेच सुनावले होते. यानंतर बॉलिवूडमध्ये दोन गट तयार झाले आहेत. काही लोक जया बच्चन यांचे समर्थन करत आहेत तर काहींनी त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. यानंतर मुंबई पोलिसांनी सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि खासदार आणि अभिनेत्री जया बच्चन यांना खबरदारी म्हणून संरक्षण दिले आहे.

जुहूमधील बच्चन यांचा बंगला जलसाच्या बाहेर मुंबई पोलिसांनी अतिरिक्त सुरक्षा पुरवली आहे. जया बच्चन यांच्या भाषणानंतर सोशल मीडियावर त्यांच्यावर टीका झाली यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षा देण्यात आली आहे.

बॉलिवूडमधील ड्रग्जचा वाद मंगळवारी संसदेत पोहोचला. पावसाळी अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी राज्यसभेत समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी ड्रग्जच्या वादातून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. त्यांनी भाजपचे खासदार रवी किशन यांचे नाव न घेता म्हटले होते की, फिल्म इंडस्ट्रीत नाव कमावणारे इंडस्ट्रीलाच गटार म्हणत आहेत. मला आशा आहे की सरकारने अशा लोकांना अशी भाषा न वापरण्यास सांगावे. '

'जया बच्चन म्हणाल्या की काही लोकांमुळे आपण संपूर्ण इंडस्ट्रीची प्रतिमा खराब करू शकत नाही. मला लाज वाटते की काल चित्रपटसृष्टीतील लोकसभेतील आमच्या एका सदस्याने त्याविरूद्ध भाषण केले. हे लाजीरवाणे आहे. आपण ज्या ताटात जेवतो त्यातच छिद्र करु शकत नाही.' असे जया बच्चन म्हणाल्या होत्या.

रवी किशन यांनी लोकसभेत काय म्हटले होते?
सोमवारी भाजप खासदार रवी किशन यांनी लोकसभेत ड्रग्ज आणि बॉलिवूड कनेक्शनचा मुद्दा उपस्थित केला होता. ते शून्य तासाच्या दरम्यान म्हणाले होते की, पाकिस्तान आणि चीनमधून ड्रग्सची तस्करी केली जात आहे. देशातील तरुण पिढी उद्ध्वस्त करण्याचा हा कट आहे. ते म्हणाले की ते आपल्या चित्रपटसृष्टीत शिरले आहे आणि एनसीबी त्याचा तपास करीत आहे. ते म्हणाले की, माझी मागणी आहे की या संदर्भात कठोर कारवाई केली जावी.