आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसचा गौप्यस्फोट:'मोहन डेलकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी मोदी व शाह यांना पत्र लिहिले होते, पण त्यांनी भेटही घेतली नाही'

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जर आम्ही आमच्या खासदाराला वाचवू शकलेलो नाही, तर आम्हाला आमच्या लोकशाहीचा अभिमान वाटावा का?

दादरा, नगर हवेली येथील लोकप्रिय खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या केली होती. या आत्महत्येची चौकशी सुरू आहे. दरम्यान या आत्महत्या प्रकरणावरुन राजकीय वर्तुळात अनेक आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. डेलकर यांना भाजप नेते आणि केंद्रीय प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या छळामुळे आत्महत्या करावी लागल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. तसेच ही भारतीय लोकशाहीसाठी शोकांतिका असल्याचेही ते म्हणाले आहेत. यावेळी सचिन सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह खासदार मोहन डेलकर यांना वाचवू शकले नसल्याचेही ते म्हणाले आहेत.

सावंत पुढे म्हणाले की, 'मोहन डेलकर यांनी दोन पत्र लिहिले होते. या पत्राद्वारे त्यांनी आपली व्यथा आणि त्यांच्यावर होणारे अत्याचार मांडले होते. तसेच त्यांना वारंवार केंद्रीय अधिकारी व भाजपच्या नेत्यांकडून अपमानित केले जात होते. यासंदर्भात त्यांनी पूर्णपणे माहिती त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी दिली होती. त्याचबरोबर त्यांनी भेटीची वेळ देखील मागितली होती. त्यांना स्वतः भेटून आपली व्यथा सांगायची होती. मात्र पंतप्रधान त्यांना भेटलेही नाहीत. असा आरोप देखील सचिन सावंतांनी केला आहे.

पुढे बोलताना सावंत म्हणाले की, 'जर आम्ही आमच्या खासदाराला वाचवू शकलेलो नाही, तर आम्हाला आमच्या लोकशाहीचा अभिमान वाटावा का? तसेच खासदार मोहन डेलकर यांनी पंतप्रधान, गृहमंत्री आणि लोकसभा अध्यक्ष या सर्वांचा दरवाजा ठोठवला होता. 18 डिसेंबर 2020 आणि 31 जानेवारी 2021 या दिवशी पंतप्रधान मोदींना पत्र मिळाले होते तरीही त्यांना का मदत केली नाही?' असा सवाल सचिन सावंतांनी यांनी केला आहे.

बातम्या आणखी आहेत...