आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाचा विळखा:खासदार नारायण राणे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह, घरीच होणार क्वारंटाइन, नागरिकांना केले काळजी घेण्याचे आवाहन

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • डॉक्टरांच्या सल्लानुसार काही दिवस आयसोलेट राहणार आहे.

देशभरातील कोरोनाचा रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. दरम्यान आता अनलॉक 5 चा टप्पा आजपासून सुरू झाला आहे. अनेक निर्बंध सरकारकडून शिथिल करण्यात आले आहेत. अशात कोरोना रुग्ण सातत्याने वाढत आहे. अनेक राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. आता भाजप खासदार नारायण राणे यांचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

नारायण राणे यांनी स्वत: ट्वीट करून या संदर्भात माहिती दिली.'माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. माझी तब्येत अतिशय उत्तम असून डॉक्टरांच्या सल्लानुसार मी काही दिवस आयसोलेट राहणार आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. लवकरच मी लोकसेवेत पुन्हा रुजू होईन'

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser