आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदार राऊत हजर, वॉरंट रद्द:अब्रुनुकसान प्रकरणात पुढील सुनावणी 24 तारखेला

मुंबई21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अब्रुनुकसान खटल्यात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर हजेरी लावली. त्यानंतर त्यांच्याविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्यात आले. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा यांनी राऊतांवर हा खटला दाखल केला आहे. न्यायालयीन कामकाजादरम्यान राऊत यांच्या वकिलांनी राऊत यांना हजर राहण्यापासून सवलत मिळावी, अशी विनंती केली. परंतु कोर्टाने ती फेटाळली. या प्रकरणात शुक्रवारी तक्रारदारांचा जबाब नोंदवण्यात आला. दुपारनंतर राऊत कोर्टात हजर झाले. त्यानंतर वॉरंट रद्द केले. पुढील सुनावणी २४ जानेवारी रोजी होईल.

काय आहे प्रकरण
मीरा भाईंदर येथील सार्वजनिक स्वच्छतागृहाचे बांधकाम प्रकरणात मेधा व किरीट सोमय्यांनी १०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप राऊत यांनी केला. त्यावरून बदनामी झाल्याचा दावा करून मेधा सोमय्या यांनी राऊतांवर अब्रुनुकसानीचा खटला दाखल केलेला आहे. या खटल्याच्या सुनावणीसाठी राऊत वारंवार गैरहजर राहत होते. त्यामुळे कोर्टाने खा. राऊत यांना अटक वॉरंट बजावला होता.

बातम्या आणखी आहेत...