आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खोचक:वादळात विधान परिषद आमदारांची फाइल वाहून गेली का? संजय राउत यांचा राज्यपालांना खोचक सवाल; 6 महिन्यानंतरही राज्यपालांच्या मंजुरीची प्रतीक्षा

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • संजय राऊत यांनी योगगुरु रामदेव यांच्या वक्तव्यावर देखील प्रश्न उपस्थित केला आहे

मुंबई उच्च न्यायालयाने 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत विचारणा केल्यानंतर पुन्हा एकदा राज्यपाल नियुक्त होणाऱ्या आमदारांचा प्रश्न चर्चेत आला आहे. सहा महिने उलटले तरी 12 आमदारांचा नियुक्तीचा प्रश्न का लटकत ठेवला आहे असा प्रश्न शिवसेना नेते संजय राऊत यांनी उपस्थित केला.

सहा महिने होऊन गेले पण 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत निर्णय झाला नाही त्यात अस कोणतं संशोधन चालू आहे. पंतप्रधान मोदींनी सर्जिकल स्ट्राइकदेखील 24 तासात केली होता. मग ह्या नियुक्त्यांना एव्हढा वेळ का लागत आहे. असा प्रश्न उपस्थित करतानाचा 12 आमदारांचा सदस्यत्व रोखून ठेवणे हा घटनेचा भंग आहे असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे.

ते पुढे बोलताना म्हणाले की, आमदारांच्या नियुक्त्या रोखून धरण्यात राजकारण केले जात असून महाराष्ट्राच्या जनतेवर हा एकप्रकारे अन्याय आहे. एव्हढा उशीर का लागतोय? राजभवनातील त्या 12 आमदारांच्या फाईल काय वादळामध्ये वाहून गेल्यात की तिथे कोणी भूत-प्रेत आलं होतं असा मिश्किल टोलादेखील संजय राऊतांनी लगावला आहे.

दरम्यान, संजय राऊत यांनी योगगुरु रामदेव यांच्या वक्तव्यावर देखील प्रश्न उपस्थित केला आहे. योगगुरु रामदेव यांच्या ऐवजी दुसरा कोणी काही बोललं असतं तर भाजप रस्त्यावर उतरून चक्काजाम केला असतं. मात्र भाजप योगगुरु रामदेव यांच्या बाबतीत शांत असल्याचेदेखील ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...