आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावरकरांवर टीका केली म्हणून नेहरूंवर आरोप करू नये:राऊतांची रणजीत सावरकरांवर टीका, म्हणाले - आम्हीही सावरकरप्रेमी

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुणी स्वातंत्र्यवीर सावरकरांविरोधात काही बोलले म्हणून पंडित नेहरूंवर टीका करणे चुकीचे आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वशंज म्हणवणाऱ्यांनी तरी असे करू नये, अशा शब्दांत आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी वीर सावरकरांचे पणतू रणजीत सावरकरांना सुनावले.

...तर हिंदूस्तानचा पाकिस्तान

खासदार संजय राऊत म्हणाले, आम्ही सर्व सावरकरप्रेमी आहोत. वीर सावरकर हे विज्ञाननिष्ठ होते आणि भारतालाही या मार्गावर नेण्याचे मोठे काम पंडीत नेहरू यांनी केले आहे. सावरकरांच्या भूमिकेलाच नेहरूंनी पुढे नेले आहे. नेहरू नसते तर हिंदूस्तानचा पाकिस्तान झाला असता.

देश नेहरूंचा ऋणी

खासदार संजय राऊत म्हणाले, पाकिस्तान आज धर्मांध राष्ट्र झाले आहे. पंडित नेहरूंनी ते होऊ दिले नाही. त्यामुळे देश नेहरूंचा कायम ऋणी राहिल. या देशाला विकासाच्या, सावरकरांच्या विज्ञाननिष्ठेच्या वाटेने पुढे नेण्याचे काम पंडित नेहरूंनी केले आहे.

नवीन माहिती नाही

राऊत म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात वीर सावरकर, सुभाषचंद्र बोस, पंडित नेहरू, महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अब्दुल कलाम आझाद या सर्वांचेच योगदान होते. त्या सर्वांच्या योगदानाबाबत सर्वांना माहिती आहे. त्यामुळे आता त्यांच्याबाबत वाद निर्माण करून देशातील जनतेला नवीन काही ज्ञान मिलेल, असे नाही. या सर्व नेत्यांप्रती जनतेच्या मनात आदर आहे.

चिखलफेक करू नये

राऊत म्हणाले, स्वातंत्र्याच्या लढाईत भाग घेतलेले सर्व नेते हे कोणा एका विचारधारेचे नसतात. तसेच, वीर सावरकरांबाबत जे वाद आहेत, त्यावर अनेकदा चर्चा झाली आहे. आता जे काही सुरू आहे, त्यातून नवी काही माहिती मिळत नाहीये. वीर सावरकरही या सर्वांबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी आता जिवंत नाही. त्यामुळे उगीच या महापुरुषांबद्दल वाद निर्माण करू नये.

बातम्या आणखी आहेत...