आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेना खासदार संजय राऊत यांच्या जामीन रद्द करावा अशी मागणी ईडीने केली आहे. या प्रकरणी ईडीने उच्च न्यायालयात धाव घेतली असून या प्रकरणाची सुनावणी आज होणार आहे. आज राऊतांचा जामीन रद्द होणार की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
ईडीकडून संजय राऊतांना झालेल्या अटकेवर कोर्टाने ताशेरे ओठल्यानंतर आजच्या सुनावणीमध्ये नेमके ईडी काय युक्तिवाद करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. खासदार संजय राऊतांच्या सुटकेनंतर ईडीने न्यायालयात जामीनाला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. या निकालाला उच्च न्यायालयात आव्हान देण्याकरता संधी देण्याचाही युक्तिवाद ईडीच्या वतीने करण्यात आला आहे.
पत्राचाळ घोटाळा प्रकरणात ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना जामीन मंजूर झाला.पीएमएलए न्यायालयाकडून त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच, या प्रकरणात प्रवीण राऊत यांनाही न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यानंतर या निर्णयाविरोधात ईडीतर्फे मुंबई हायकोर्टात धाव घेतली. परंतु, हायकोर्टानेही संजय राऊत यांच्या जामिनावरील स्थगितीला नकार दिला. हा राऊतांना सर्वात मोठा दिलासा तर ईडीला झटका मानला जात असून आज सायंकाळी सातपर्यंत राऊत जेलमधून बाहेर येणार आहेत.
राजकारणात तुरुंगात जावेच लागते
संजय राऊत म्हणाले, माझ्या सुटकेमुळे संपूर्ण देशात चांगले वातावरण तयार झाले आहे. ज्यांनी माझ्याविरोधात कटकारस्थान रचले, त्यांच्याही आनंदात मी सहभागी आहे. ईडीवर मी काहीही टीप्पणी करणार नाही. कुणाविरोधातही माझी खंत नाही. राजकारणी लोकांना एकदा तरी तुरुंगात जावच लागत. मीही गेलो. मात्र, या काळात कुटुंबाने खुप काही भोगले.
मोदी, शहांना भेटणार
जामीनावर बाहेर येताच संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजकारणातील कटुता कमी झाली पाहीजे, या फडणवीसांच्या वक्तव्याचे मी स्वागत करतो. महाराष्ट्रात सर्वच नेते एकमेकांशी सातत्याने भेट घेत असतात. मीदेखील देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांचीही लवकरच भेट घेणार आहे. माझी सुटका झाल्याने देशाच्या न्यायव्यस्थेवरील आपला विश्वासही वाढला असल्याचे राऊत म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.