आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्राचाळ घोटाळा प्रकरण:खासदार संजय राऊतांचा जामीन रद्द होणार का?, ईडीच्या याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी

मुंबई6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पत्राचाळ घोटाळा प्रकरणी खासदार संजय राऊत यांना न्यायालयाने दिलेला जामीन रद्द करण्यासाठी ईडीकडून याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी होणार असून राऊतांच्या विरोधात पुरावे असल्याचे ईडीकडून सांगण्यात येत आहे. खासदार संजय राऊत यांना दिलेला जामीन रद्द करण्यात यावा अशी याचिका ईडीने हायकोर्टात दाखल केली. यावर काय निर्णय येणार याकडे आता सर्वाचे लक्ष लागले आहे.

संजय राऊत यांची पत्राचाळ घोटाळाप्रकरणी अटक थेट बेकायदेशीर ठरवत पीएमएलए कोर्टाने ईडीला धक्का दिला होता. संजय राऊत यांना सदरील प्रकरणी न्यायालयाकडून 2 लाख रुपयांच्या रोख रमकेमवर जामीन मंजूर झाला. पण, त्याला स्थगितीची मागणी ईडीकडून लागलीच करण्यात आली. जामिनाला स्थगिती देण्याची ईडीने पीएमएलए कोर्टाकडे मागणी केली होती. ही मागणी फेटाळल्याने संजय राऊत यांना मोठा दिलासा मिळाला. ज्यानंतर ईडीनं हायकोर्टात धाव घेतली.यामुळे ईडीच्या तपासावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

नेमके काय आहे प्रकरण ?

गोरेगावमध्ये गुरुआशिष कंपनीला चाळीच्या पुनर्विकासाचे काम देण्यात आले होते. यावेळी प्रवीण राऊत यांनी या जागेतील एफएसआय परस्पर विकल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. गोरेगाव पश्चिमेतील सिद्धार्थनगर भागातील या झोपडपट्टीचे काम न करताच परस्पर काही वर्षांपूर्वी इथला एफएसआय बेकायदेशीररित्या विकण्यात आला. जवळपास 1 हजार कोटी रुपयांचा होता. एचडीआयएलच्या प्रमोटर्सना पैशांची अफरातफर करण्यात मदत केली, असा आरोपही प्रवीण राऊत यांच्यावर आहे.

मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल असलेल्या प्रवीण राऊत यांच्या पीएमसी बँकेतील खात्यातून वर्षा राऊत यांच्या अकाउंटवर 12 वर्षांपूर्वी 50 लाख जमा करण्यात आले होते. त्याबाबत ईडीकडून त्यांच्याकडे गेल्या दीड महिन्यापासून विचारणा सुरू होती. संजय राऊत यांचे निकटवर्तीय समजले जाणारे प्रवीण राऊत सध्या न्यायालयीन कोठडीत असून पत्राचाळ घोटाळ्यातील पैशातून अलिबागमध्ये जमीन खरेदी करण्यात आल्याचा संशय ईडीला होता. याच अंतर्गत ईडीने आज मोठी कारवाई करत संजय राऊतांना दणका दिला आहे. अलिबागमधील एकूण 8 प्लॉट आणि दादरमधील एक फ्लॅट ईडीने जप्त केला आहे. गोरेगाव झोपडपट्टी प्रकरणी प्रवीण राऊत यांची जवळपास 72 कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. यांनतर आता संजय राऊतांच्या पत्नीशी निगडीत जागांवर ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...