आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटीस:खासदार संजय राऊत यांची नारायण राणेंना नोटीस, आरोप सिद्ध करण्याचे आव्हान

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जाहीरपणे बिनबुडाचे आरोप केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री व भारतीय जनता पक्षाचे नेते नारायण राणे यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी शुक्रवारी दिली.

खासदार संजय राऊत यांनी याबाबत एक ट्वीट केले आहे. ते असे- नारायण राणेंनी आपल्यावर केलेल्या आरोपांचे पुरावे सादर करावेत, अन्यथा माफी मागावी. राणे यांनी माझ्यावर तसेच शिवसेनेवर बिनबुडाचे आरोप केले. आता त्यांनी ते सिद्ध करून दाखवावेत. म्हणूनच माझे वकील सार्थक शेट्टी यांच्यामार्फत राणेंना नोटीस पाठवली आहे. जय महाराष्ट्र.

राणेंनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर तसेच शिवसेनेवर सर्वात कडवट टीका केली. राणे व राऊत यांच्यात अनेक वेळा शाब्दिक संघर्ष उडाल्याचे पाहायला मिळाले आहे. परंतु अलीकडे तर उभय नेत्यांतील आरोप-प्रत्यारोप अतिशय वैयक्तिक पातळीवर झाले असल्याने राजकारण ढवळून निघाले आहे.

बातम्या आणखी आहेत...