आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकल ट्रेन वाद:खासदार संजय राऊतांचा रेल्वे राज्यमंत्री दानवे यांच्यावर पलटवार; म्हणाले - रेल्वे भाजपची नोकर आहे का?

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुंबईत 15 ऑगस्टपासून लोकल प्रवासाची मुभा

कोरोना महामारीच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे राज्यातील लोकल सेवा अनेक दिवसापासून बंद आहे. परंतु, राज्य सरकारने येत्या 15 ऑगस्टपासून लोकल सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधताना ही मोठी घोषणा केली. परंतु, ज्या लोकांचे कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहे, त्यानांच याचा लाभ घेता येणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचे सर्वच स्तरांतून स्वागत केले जात आहे. परंतु, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दावने यांनी हा निर्णय घेण्याआधी रेल्वेसोबत चर्चा करायला हवी होती असं म्हटलं आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी रेल्वे राज्यमंत्र्यांवर जोरदार पलटवार केला आहे.

काय म्हणाले संजय राऊत?
संजय राऊत दानवे यांच्या पलटवार करताना म्हणाले की, रेल्वे ही संपूर्ण देशाची संपत्ती असून ती काही कुठल्याही राजकीय पक्षाची नसते? काही लोकांना असं वाटत की, ही आमच्याच मालकीची आहे. ज्या गोष्टी राष्ट्रीय स्तरावरील आहेत त्यांचा निर्णय राष्ट्रीय स्तरावरच व्हायला हवा असे ते म्हणाले. भाजप आंदोलनावर टीका करताना ते म्हणाले की, मुंबईमध्ये लोकल सेवा सुरु करण्यासाठी भाजपने मोठे आंदोलन केले.

परंतु, राज्यातील परिस्थिती चिंताजनक असल्याने राज्य सरकारने ती बंद केली होती. आता हळू हळू परिस्थिती पूर्ववत होत असल्याने मुख्यमंत्र्यांनी लोकल सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला. भाजप अगदी रस्त्यांवर, रुळांवर आडवे पडले. असे आडवे पडले की इथून आम्ही उठणारचं नाही असा टोला राऊतांनी भाजपवर लगावला आहे.

हे उलट्या खोपडीचं राजकारण
राऊत पुढे म्हणाले की, राज्यात कधीही रेल्वे सुरु करा आम्ही तुमच्या पाठीशी असल्याचे दानवे यांनी म्हटले होते. परंतु, आज निर्णय घेतल्यानंतर दानवे यांची भाषाच बदलली. हा जो काही प्रकार चालू आहे हे उलट्या खोपडीचं राजकारण असल्याचे ते म्हणाले. रेल्वे ही काय भाजपची नोकर आहे का? असा संतप्त सवाल राऊतांनी यावेळी उपस्थित केला आहे.

मुंबईत 15 ऑगस्टपासून लोकल प्रवासाची मुभा
ज्या नागरिकांनी कोरोनाच्या दोन मात्रा घेतल्या आहेत, अशा सामान्य प्रवाशांना 15 ऑगस्टपासून मुंबई उपनगरीय रेल्वेगाड्यांत प्रवासाला मुभा देण्यात येणार आहे. त्यासाठी एक अॅप बनवण्यात आले असून त्यावर नागरिकांना नोंदणी करावी लागेल. मुंबईत सध्या दोन डोस घेतलेले 19 लाख नागरिक आहेत,’ असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...