आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नेत्यांना कोरोना:अजित पवारांपाठोपाठ खासदार सुनील तटकरे यांना कोरोनाची लागण, खबरदारीचा उपाय म्हणून खासगी रुग्णालयात दाखल

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुनीट तटकरे यांनाही मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले

एकीकडे नव्या रुग्णांच्या संख्येत घट होत असताना दुसरीकडे मात्र राजकीय नेते कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना यांच्या पाठोपाठ खासदार सुनील तटकरे यांनाही कोरोनाची लागण झाली. तटकरे यांना उपचारासाठी मुंबईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

खासदार सुनील तटकरे यांची सोमवारी कोरोनाची चाचणी करण्यात आली होती. आज कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. सुनील तटकरे यांची प्रकृती उत्तम असून खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अजित पवार यांना दाखल केलेल्या मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्येच तटकरे यांनाही दाखल करण्यात आले आहे. दरम्यान 'सर्वांच्या सदिच्छा आणि आशीर्वाद यांच्या बळावर लवकरात लवकर पुन्हा सेवेत रुजू होईन', असे तटकरे यांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...