आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबाबरी पाडण्यात शिवसेना तसेच बाळासाहेब ठाकरे यांचा कोणताही सहभाग नव्हता, असा दावा करुन भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी खळबळ उडवून दिली आहे. त्यावरून ठाकरे गटाचे नेते आता आक्रमक झाले असून चंद्रकांत पाटील तसेच भाजपवर सडकून टीका करत आहेत.
बुद्धीदारिद्रय समोर येत आहे
चंद्रकांत पाटील यांना सत्तेचा माज आला आहे, अशा शब्दांत खासदार विनायक राऊत यांनी टीका केली आहे. आज रत्नागिरी येथे पत्रकार परिषदेत विनायक राऊत म्हणाले की, बाबरी पाडल्यानंतर काय झाले?, हे अख्ख्या जगाने पाहीले आहे. गुन्हा दाखल होईल या भीतीचे भाजपचे नेते लोकसभेत रडत होते. तर, बाबरी पाडणाऱ्यांच्या पाठीवर शाबासकी थाप देणारे, त्यांना आधार देणारे बाळासाहेब एकमेव होते. चंद्रकांत पाटील यांना सत्तेचा माज आल्यानेच ते असे वक्तव्य करत आहेत. ते आपले बुद्धीदारिद्रय दाखवत आहेत. त्यांच्या अशा वक्तव्यामुळे जनता त्यांना हसत आहे.
दरम्यान, नारायण राणेंवर टीका करताना खासदार विनायक राऊत म्हणाले की, त्यांना भाजपने पाळलेले आहे. भाजपने पाळलेले कुत्रे आता आमच्यावर भुंकायला लागले आहेत. मात्र, भुंकणारे कुत्रे चावत नसतात, हे आम्हाला माहिती आहे.
खाल्ल्या ताटात घाण करण्याची वृत्ती
अयोध्या दौऱ्यात रामदास कदम यांनीही उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. त्यावर खासदार विनायक राऊत म्हणाले की, रामदास कदम अत्यंत सूडबुद्धीने वागत आहेत. खाल्ल्या ताटात घाण करण्याची त्यांची वृत्ती आहे. या वृत्तीतूनच ते आता उद्धव ठाकरेंना नामशेष करण्याची भाषा करत आहेत. त्यांचे राजकीय जीवन ज्या मातोश्रीने घडवले, अशा आईचा, मातोश्रीचा ते अपमान करत आहे. नियती त्यांना कधीही माफ करणार नाही.
संबंधित वृत्त
खुलासा:बाळासाहेबांबद्दल माझ्या मनात नितांत आदर; उद्धव ठाकरेंना फोन करून भूमिका समजावून सांगणार- चंद्रकांत पाटील
बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे. बाबरी पाडली तेव्हा पक्षाचे नव्हे तर विश्व हिंदू परिषदेचे नेतृत्व होते, असे मी म्हणालो होता. मात्र, माझ्या वक्तव्याचा नेहमीप्रमाणे 'ध'चा 'मा' करण्यात आला, असा खुलासा भाजप नेते ंचंद्रकांत पाटील यांनी केला आहे. बाबरी पाडण्यात शिवसेना तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहभाग नव्हता, असा दावा चंद्रकांत पाटलांनी केल्याने उद्धव ठाकरेंनी त्याच्यावर सडकून टीका केली आहे. तसेच, ठाकरे गटाकडूनही चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार हल्ला चढवण्यात येत आहे. त्यावर आज पुण्यात पत्रकार परिषद घेत चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण दिले. वाचा सविस्तर
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.