आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानितेश राणे यांनी नारायण राणे यांची राजकीय कारकीर्द आठवावी. स्वतःच्या सख्ख्या चुलत भावाचे घरासमोर डोके फोडून त्याला नांदगाव येथे नेऊन जाळून टाकले. यांची हैवानाची औलाद आहे. राणेंची नार्को टेस्ट केली तर अनेक खुनांना वाचा फुटेल, अशी घणाघाती टीका ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना राऊत यांनी भाजप आमदार नितेश राणे यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, येथील आमदाराची उंची किती, डोकं केवढं, त्याच्यात अक्कल केवढी, मेंदू केवढा तरीही आकांडतांडव करायचा. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करण्याचे एकच टार्गेट धरले. हे करताना नितेश राणेंनी वडिलांची राजकारणातील कारकीर्द आठवावी. सख्ख्या चुलत भावाचे घराच्यासमोर डोके फोडून गाडीत घालून नांदगावला नेऊन जाळून टाकले, असा राणेंचा इतिहास. नारायण राणेंच्या राजकीय कारकीर्दीत जेवढे खून झाले, जेवढे लोक बेपत्ता झाले. त्या सगळ्यांची एसआयटी चौकशी झाली पाहिजे, नाहीतर नारायण राणेंची नार्को टेस्ट करण्यात यावी जेणेकरून रक्तरंजित इतिहास कोणी घडवला हे सर्वांना कळेल. परंतु २०१४ नंतर शिवसेनेची सत्ता जिल्ह्यात आल्यानंतर एकही राजकीय बळी गेला नाही. आम्हाला जिल्ह्यात शांतात हवी आहे. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करायचा आहे,.असे खासदार विनायक राऊत यांनी ठणकावून सांगितले.
पनवेल रुग्णालयात भ्रष्टाचार
नारायण राणे यांना माझा प्रश्न आहे, त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी आपल्या ग्रामदेवतेची शपथ घेऊन सांगावे कोरोनाच्या काळामध्ये तुमच्या त्या पनवेलच्या रुग्णालयामध्ये लोकांना फसवले नाही म्हणून. आलेल्या प्रत्येक रुग्णाला तुम्ही लुबाडलं नाही म्हणून सांगावे. कोणाच्या काळात लाखोंचा करोडोंचा भ्रष्टाचार तुमच्या पनवेलच्या रुग्णालयात झालाॽ हिम्मत असेल तर ऑडिट करायला तयार राहा, असे आव्हान खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे यांना दिले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.