आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र लोकसेवा आयोग गतिमान:पोलिस उपनिरीक्षक पदांसाठीच्या शारीरिक चाचणीनंतर चारच तासात निवड यादी, गुणवत्ता यादी जाहीर

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोलिस शिपाई, पोलिस नाईक, पोलीस हवालदार आणि सहायक पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांना पोलीस उपनिरीक्षक पदांसाठीच्या शारीरिक चाचणीनंतर चार तासातच जलदगतीने आणि उमेवारांना प्रतिक्षा करण्याची संधी न देता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने निवड यादी व सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर केली आहे.

1031 उमेदवारांची शारीरिक चाचणी

पोलिस उपनिरीक्षक पदांसाठीच्या 250 पदांवर पदोन्नती देण्याकरीता विभागीय स्पर्धा परीक्षेतील 1031 उमेदवारांची शारीरिक चाचणी दिनांक 28 नोव्हेंबर, 2022 ते दि. 02 डिसेंबर 2022 या कालावधीत डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित पद्धतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पुणे केंद्रावर घेण्यात आली.

रोज 250 उमेदवारांची चाचणी

प्रतिदिन सुमारे 250 उमेदवारांचा शारीरिक चाचणी कार्यक्रम पूर्ण करून, दि. 02 डिसेंबर, 2022 रोजी या परीक्षेची तात्पुरती निवड यादी व सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर त्वरीत प्रसिद्ध करण्यात आली.

30 जुलै झाली मेन्स

पोलिस उपनिरीक्षक संवर्गातील 50 पदांवरील नियुक्तीसाठी दि. 16 एप्रिल 2022 रोजी पोलिस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2021 घेण्यात आली होती. या पूर्व परीक्षेच्या दि. 09 जून 2022 रोजी निकाल जाहीर करण्यात आला. या निकालाच्या आधारे पोलिस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2021 चे आयोजन दि. 30 जुलै, 2022 रोजी करण्यात आले व मुख्य परीक्षेचा निकाल दि. 23 सप्टेंबर 2022 रोजी जाहीर करण्यात आला.

मुख्य परीक्षेच्या निकालाआधारे एकूण 1031 उमेदवार शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरले होते. परीक्षेच्या भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प सादर करण्याकरीता आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील 'ONLINE FACILITIES' या मेनूमध्ये 'Post Preference / Opting Out' वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. सदर वेबलिंक दि. 3 डिसेंबर 2022 रोजी 12.00 वाजेपासून दिनांक 10 डिसेंबर, 2022 रोजी 23.59 वाजेपर्यंत सुरु राहील.

ऑनलाईन पद्धतीखेरीज अन्य कोणत्याही प्रकारे पाठविलेला भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय ग्राह्य धरला जाणार नाही. तसेच याबाबत उमेदवारांची कोणतीही बाब / निवेदने / पत्रव्यवहार तद्नंतर विचारात घेतली जाणार नाहीत.

बातम्या आणखी आहेत...