आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोरोनाचा विळखा:मातोश्रीची चिंता वाढली, मिसेस मुख्यमंत्री रश्मी ठाकरे यांच्या सुरक्षा रक्षकाला कोरोनाचा संसर्ग

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. मुंबईत कोरोनाचा विळखा घट्ट होताना दिसतोय. आता मातोश्रीची चिंता वाढवणारी एक बातमी आहे. मिसेस मुख्यमंत्री रश्मी उद्धव ठाकरे यांच्या एका सुरक्षा रक्षकालाही कोरोनाची लागण झाली आहे. हा सुरक्षा रक्षक रश्मी ठाकरे यांच्या सुरक्षेसाठी तैनात होतादोन आठवड्यापूर्वी तेजस ठाकरे यांच्याही दोन सुरक्षा रक्षकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं वृत्त होतं. सुरक्षा रक्षकांना कोरोना झाल्यामुळे मातोश्रीची चिंता वाढली आहे.

रश्मी उद्धव ठाकरे यांच्या एका सुरक्षा रक्षकालाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. दोन दिवसांपूर्वी या सुरक्षारक्षकाची कोविड 19 चाचणी करण्यात आली होती. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे मातोश्रीची चिंता वाढली आहे. दरम्यान यापूर्वीही मातोश्री परिसरात अनेक कोरोना रुग्ण आढळलेले आहेत. या परिसरातील काही पोलिसांना कोरोनाची लागण झाली होती. आता पुन्हा एकदा कोरोना रुग्ण सापडल्याने चिंता व्यक्त केली जातेय.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही जास्तीत जास्त कामं ही घरात बसून करण्यास पसंती देत आहेत. ते राज्यभरातील अनेकांशी व्हिडिओ कॉन्फरिन्सद्वारेच संवाद साधत आहेत. दरम्यान राज्यभरात कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. यामध्ये मुंबई आणि उपनगरांमध्ये रुग्ण संख्या ही कमालीची वाढताना दिसत आहे.