आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO:मुंबई - गोवा महामार्गावर एसटी बसला भीषण आग, चालकाच्या प्रसंगावधानामुळे सर्व प्रवासी सुखरुप

पनवेल3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • VIDEO

मुंबई - गोवा महामार्गावरील कर्नाळा अभयारण्यात आज एसटी बसला आग लागली. ही बाब लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान दाखवत बसमधील सर्व प्रवाशांना खाली उतरवले. या घटनेत सर्व प्रवासी सुरक्षित असले तरी संपुर्ण बस मात्र जळून खाक झाली आहे. बसला आग का लागली, हे मात्र अद्याप स्पष्ट आहे.

कर्नाळा अभयारण्य हद्दीतून जात असताना गाडीच्या बॉनेटमधून धूर येत असल्याचे बस चालक महादेव नाटकर यांच्या लक्षात आले. त्यांनी प्रसंगावधान राखून तात्काळबस थांबवून प्रवाशांना बाहेर काढले. बसमधे यावेळी जवळपास 52 प्रवाशी असल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी प्रवाशांचे सामान व बस पूर्णतः जळून खाक झाली.

गाडीतून उतरताच तिथे असलेल्या एका व्यक्तिने अग्निशमन दलाला याबाबत माहिती दिली. दरम्यान आग भडकल्याने प्रवाशांसह वाहकाचे सर्व सामान जाळून खाक झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहचून आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र तो पर्यंत बस जळून खाक झाली होती. या अपघातामुळे मुंबई - गोवा महामार्गावरील गोव्याच्या दिशेने जाणारा महामार्ग काही काळ बंद करण्यात आला होता. या महामार्गावर तात्पूरत्या स्वरुपात एकेरी वाहतूक सुरु केल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. यानंतर पोलिसांनी बस बाजूला काढत महामार्ग मोकळा केला आहे.

बातम्या आणखी आहेत...