आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अँटिलिया केस:NIA ने मुंबईत पोहचताच सुरु केली छापेमारी, मुकेश अंबानींच्या घराबाहेरील सुरक्षारक्षकांची चौकशी

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया घराबाहेर 25 फेब्रुवारीला आढळून आलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पियो गाडीचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेच (NIA) ने सुरु केला आहे. मंगळवारी एक टीम मुंबईत पोहचली आहे. या टीमने मुंबईत येताच विविध ठिकाणी छापेमारी सुरु केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, NIAची टीम स्कॉर्पियो गाडीच्या मागे दोन वेळेस दिसून आलेल्या इनोव्हा गाडीच्या तपासाच्या अत्यंत जवळ पोहोचली आहे.

अँटिलियामध्ये गेली NIA टीम
या टीमला एक IG (इंस्पेक्टर जनरल) लेव्हलचा अधिकारी लीड करत आहे. मंगळवारी एका टीमने अँटिलियामध्ये जाऊन तेथील सुरक्षा कर्मचारी आणि सुरक्षा अधिकाऱ्यांची चौकशी केली. तेथील CCTV फुटेजही ताब्यात घेतले आहे. अशीही माहिती समोर येत आहे की, टीम आज या घटनेचा सिन रिकन्स्ट्रक्शन करेल.

बातम्या आणखी आहेत...