आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण:NIA ने दाखल केले आरोपपत्र, सचिन वाझेसह 10 जणांना बनवले आरोपी

20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुकेश अंबानींच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकाने भरलेल्या स्कॉर्पियोचा मालक मनसुख हिरेनच्या हत्येप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आपले आरोपपत्र दाखल केले आहे. एनआयएने सचिन वाझेसह 10 जणांना आरोपी केले आहे. आरोपपत्रात असे म्हटले आहे की, मनसुखला मारण्यासाठी 45 लाख रुपये देण्यात आले होते.

9 जून रोजी विशेष न्यायालयाने एनआयएला मनसुख प्रकरणी आरोपपत्र सादर करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत दिली होती. तपास यंत्रणेने न्यायालयाला सांगितले की, आतापर्यंत 150 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. एका टीमने चौकशीसाठी दिल्लीला जाऊन काही लोकांची चौकशीही केली आहे.

NIA दोन फोनचीही चौकशी करत आहेत

एनआयएने मनसुख प्रकरणी दोन फोन जप्त केले आहेत. हे फोन दिल्लीच्या तिहार जेलमध्ये बंद असलेल्या इंडियन मुजाहिदीनचा कथित प्रमुख तहसीन अख्तरकडून जप्त करण्यात आले आहेत. अख्तरने कबूल केले आहे की हे दोन्ही फोन त्याचे आहेत. यासंदर्भात एनआयएने न्यायालयाला सांगितले की, या फोनच्या तपासामुळे अनेक महत्त्वाचे खुलासेही होऊ शकतात, त्यामुळे आणखी काही वेळ आवश्यक आहे.

जैश-उल-हिंदने जबाबदारी स्वीकारली
25 फेब्रुवारी रोजी स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पियो अँटिलियाच्या बाहेर सापडली. काही दिवसांनंतर, टेलिग्रामवर दोन संदेश पाठवून, जैश-उल-हिंद नावाच्या दहशतवादी संघटनेने स्फोटके ठेवण्याची जबाबदारी घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अख्तरने एनआयएला सांगितले आहे की त्याने टेलिग्रामवर संदेश पाठवले नाहीत. त्याचबरोबर एनआयए या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याविरोधात सापडलेल्या पुराव्यांचीही चौकशी करत आहे. तपासानंतर त्या अधिकाऱ्याच्या अटकेची परवानगीही मागितली जाईल.

आतापर्यंत या लोकांना मनसुख प्रकरणात अटक
एनआयएने आतापर्यंत मनसुख प्रकरणात मुंबई पोलिसांचे बडतर्फ एपीआय सचिन वाझे, एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा, रियाझुद्दीन काझी आणि सुनील माने यांना अटक केली आहे. एनआयएने माजी पोलिस हवालदार विनायक शिंदे आणि क्रिकेट बुकी नरेश गोर यांनाही अटक केली होती. हे सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...