आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या कार प्रकरणी नव-नवीन खुलासे होत आहे. आता या प्रकरणात एक सीसीसीटीव्ही फुटेज समोर आले. त्यामध्ये कारजवळ PPE किट घातलेली व्यक्ती दिसून आली आहे. मुंबई पोलिसांची टीम सध्या 2000 सीसीटीव्ही कॅमेरे पाहून तपास करत आहेत. एटीएसकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिप्रमाणे, ओळख लपविण्यासाठी संबंधित व्यक्तीने मुद्दाम PPE किट घातले असावे. तत्पूर्वी समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक स्कॉर्पिओ आणि एक इनोव्हा कार दिसून आली होती. पीपीई किट घातलेली व्यक्ती कार ड्रायव्हर असेल असेही सांगितले जात आहे. हीच इनोव्हा कार स्फोटके असलेल्या स्कॉर्पिओचा पाठलाग करत होती.
NIA सुद्धा करत आहे तपास
उद्योजक मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया घराबाहेर स्कॉर्पिओमध्ये जिलेटीनच्या कांड्या सापडल्या होत्या. आता या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्था (NIA) सुद्धा करत आहे. या प्रकरणात महाराष्ट्र ATS कडूनही तपास सुरू आहेत. अशात पुन्हा केंद्र आणि राज्य सरकार समोरा-समोर आलेले दिसून येतात. तपासात एनआयएची एंट्री झाल्याने काही तरी गडबड असेलच असा संशय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. केंद्र सरकार काही तरी लपविण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केला.
उल्लेखनीय बाब म्हणजे, स्कॉर्पिओचा मालक मनसुख हिरेनचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. त्याच्या मृत्यू प्रकरणात दहशतवाद विरोधी पथकाने एफआयआर दाखल केला आहे.
काय आहे प्रकरण?
25 फेब्रुवारी रोजी दक्षिण मुंबईतील पेडर रोड येथे असलेल्या अँटिलिया इमारतीच्या बाहेर स्फोटकांनी भरलेली एक स्कॉर्पिओ उभी असल्याचे समोर आले. 24 फेब्रुवारीच्या मध्यरात्री ही स्कॉर्पिओ तेथे उभी करण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी घटना पोलिसांच्या निदर्शनास आली. तसेच कारमधून जिलेटीनच्या 20 कांड्या जप्त करण्यात आल्या. 5 मार्च रोजी स्कॉर्पिओचा मालक मनसुख हिरेनचा संशयास्पद मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वीच मनसुखने आपली गाडी चोरीला गेल्याची तक्रार दिली होती. तसेच पोलिस त्याची चौकशी सुद्धा करत होते. पोलिसांच्या चौकशीला कंटाळून मनसुखने मुख्यमंत्र्यांना एक पत्र देखील पाठवले होते असे समोर आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.