आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबईतील मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्कॉर्पिओमध्ये जिलेटिनच्या कांड्या सापडल्याच्या प्रकरणात पोलिसांना काही प्रमाणात यश मिळाले आहे. ज्या व्यक्तीच्या नावावर ती स्कॉर्पियो आहे, त्याचा शोध पोलिसांनी लावला आहे. जिलेटिन उत्पादक कंपनीच्या मालकाचाही जबाब पोलिसांनी नोंदवला आहे. आता स्कॉर्पिओबरोबर पाहिलेल्या इनोव्हा कारचा शोध अधिक तीव्र झाला आहे. आरोपी यामध्ये बसून फरार झाले होते असे मानले जात आहे. मुलुंड टोल नाक्याच्या CCTV कॅमेऱ्यामध्येही ही गाडी दिसली आहे.
पोलिस गाडीच्या मालकापर्यंत पोहोचले
गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, वाहन मनसुख हिरेन नावाच्या व्यक्तीच्या नावावर नोंदले गेले आहे. हिरेन यांनी सांगितले आहे की 17 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ते ठाण्याहून घरी जात होते. वाटेत गाडी थांबली. त्यांना घाई होती, म्हणून त्यांनी गाडी ऐरोली पुलाजवळ रस्त्याच्या कडेला पार्क केली. दुसर्या दिवशी ते गाडी घेण्यासाठी गेले असता ती सापडली नाही. त्यांनी याबाबत पोलिसांत तक्रारही केली होती.
ओळख हटवण्याचा प्रयत्न झाला
आरोपींनी वाहनाची नंबर प्लेट बदलली आणि चेसिस नंबर स्क्रॅच केला होता. असे असूनही पोलिसांनी वाहनधारकाची ओळख पटवण्यात यश मिळवले. या वाहनातून 20 नंबर प्लेट्सही सापडल्या. त्यांचे नंबर मुकेश अंबानी यांच्या कर्मचार्यांच्या गाड्यांच्या नंबरशी मिळते-जुळते आहेत. आरोपी बराच काळ त्यांच्या ताफ्याचा पाठलाग करत असल्याची शंका आहे.
नागपूरमध्ये तयार केल्या आहेत जिलेटिनच्या कांड्या
कारमधून मिळालेल्या जिलेटिनच्या कांड्या नागपूरच्या सोलर इडस्ट्रीज नावाच्या कंपनीने बनवल्या आहेत. क्राइम ब्रांचने कंपनीचे चेअरमन सत्यनारायण नुवाल यांचा जबाब घेतला आहे. ज्यांना कंपनीने जिलेटिनच्या कांड्या विकल्या आहेत. पोलिसांनी त्या लोकांची माहिती मिळवली आहे.
सत्यनारायण नुवाल यांनी सांगितले की, जिलेटिनच्या कांड्या नेहमी सीलबंद डब्ब्यामध्ये डिस्पॅच केल्या जातात आणि बॉक्सवर सर्व माहिती असते. जर बॉक्स तुटलेला असेल आणि त्यानंतर जिलेटिनचे रॉड काढण्यात आले आहेत तर याची डिलीव्हरी कोणाला केली होती हे जाणून घेणे अवघड होते.
कंपनी संपूर्ण नोंदी ठेवते
सत्यनारायण म्हणाले की जिलेटिनचा बॉक्स एखाद्यास पाठवला गेला असेल तर त्याची संपूर्ण माहिती फॉर्म -11 मध्ये दिली जाते. हा फॉर्म न भरता कोणालाही जिलेटिन रॉड दिले जात नाही. एखाद्यास डिलिव्हरी द्यायची असते, त्यासाठी परवानगी चीफ कंट्रोलर ऑफ एक्सप्लोसिव्सकडून येते. तरच एखाद्याला डिलिव्हरी दिली जाते. जिलेटिन कोणास पाठवले गेले आहे हे देखील त्यांनी सांगितले, त्याची सर्व माहिती पोलीस स्टेशन व एसपी यांना दिली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.