आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसुख हिरेन हत्या प्रकरणात मोठा खुलासा:45 लाखांची सुपारी देऊन मनसुखला ठार मारण्यात आले; फन्डिंग कुणी केली याचा शोध, NIA ने दिल्लीत जाऊनही केली चौकशी

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुकेश अंबानी यांचे घर अँटिलियाजवळ आढळून आलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओचा मालक मनसुख हिरेनच्या हत्येप्रकरणी एक नवीन खुलासा समोर आला आहे. मंगळवारी न्यायालयात या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) सांगितले की, मनसुखला ठार मारण्यासाठी 45 लाख रुपये देण्यात आले होते. एनआयएने या प्रकरणी आरोपपत्र सादर करण्यासाठी न्यायालयाकडे आणखी 30 दिवसांची वेळ मागितली आहे.

फंडिंगचा सोर्स अद्याप माहिती नाही
9 जून रोजी विशेष न्यायालयाने एनआयएला मनसुख प्रकरणी आरोपपत्र सादर करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत दिली होती. एनआयएचे म्हणणे आहे की, या प्रकरणात पैसे कोणी दिले हे शोधण्याची गरज आहे. तपास यंत्रणेने असेही सांगितले की, आतापर्यंत 150 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. एका टीमने तपासासाठी दिल्लीला जाऊन काही लोकांची चौकशीही केली आहे.

बातम्या आणखी आहेत...