आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अंबानींवर कुणाचा निशाणा?:'मुकेश भैया और नीता भाभी, ये तो बस ट्रेलर था', स्फोटकांनी भरलेल्या कारमधून मिळाले पत्र; मुकेश यांच्या गाडीचा पाठलागही केला

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'कुटुंबाला उडवण्याचा बंदोबस्त झालेला आहे. सांभाळून राहा.'

एंटीलियाबाहेर गुरुवारी संशयास्पद कारमध्ये स्फोटक सापडले असल्याने रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी हेच निशाण्यावर असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. CCTV फुटेज तपासल्यानंतर समोर आले की, एंटीलियाच्या बाहेर ही कार 24 फेब्रुवारीच्या रात्री जवळपास एक वाजता पार्क करण्यात आली होती .यापूर्वी ही कार 12.30 वाजता रात्री हाजी अली जंक्शनवरर पोहोचली होती आणि येथे जवळपास 10 मिनिटे उभी होती.

पोलिस तपासणीत असे दिसून आले आहे की, स्फोटके ठेवणारे एक महिन्यापासून एंटीलियावर लक्ष ठेवून आहेत. इतकेच नाही तर या लोकांनी मुकेश अंबानी यांच्या ताफ्यावर अनेक वेळा पाठलागही केला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती कारमध्ये बसलेलीही दिसत आहे.

पत्रात लिहिले - हा तर ट्रेलर आहे, पूर्ण तयारी झाली आहे
एंटीलियाच्या बाहेर जी संशयास्पद कार मिळाली आहे, त्यामध्ये एक पत्रही सापडले आहे. रिपोर्ट्सनुसार, हे पत्र कॉम्यूटरवर टाइप केलेले आहे. ज्या बॅगमध्ये हे पत्र सापडले आहे, त्यावर मुंबई इंडियन्स लिहिले आहे. पत्रामध्ये - 'मुकेश भैया आणि नीता भाभी, हा तर फक्त ट्रेलर होता, संपूर्ण तयारी झाली आहे. कुटुंबाला उडवण्याचा बंदोबस्त झालेला आहे. सांभाळून राहा. गुडनाइट.' मात्र या पत्राविषयी पोलिसांनी अधिकृतरित्या काहीही माहिती दिलेली नाही.

जप्त केलेली कार काही दिवसांपूर्वी गेली होती चोरीला

जी कार जप्त करण्यात आली आहे, ती मुंबईच्या विक्रोळी परिसरातून काही दिवसांपूर्वी चोरीला गेली होती. याचा चेसिस नंबर बिघडवण्यात आला आहे. मात्र पोलिसांनी कारच्या खऱ्या मालकाचा शोध लावला आहे.

अंबानींच्या घराबाहेर 20 जिलेटिनच्या कांड्या सापडल्या
गुरुवारी संध्याकाळीच रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या घर इंटीलिया जवळ 200 मीटर अंतरावर एक संशयित SUV मधून गुरुवारी संध्याकाळी पोलिसांनी जिलेटिनच्या 20 कांड्या जप्त केल्या होत्या. या SUV च्या आत काही नंबर प्लेट मिळाल्या आहेत. यामध्ये काही नंबर अंबानींच्या सुरक्षेमध्ये लावलेल्या वाहनांच्या नंबर प्लेटशीसंबंधीत आहेत. पोलिसांनुसार, नंबर प्लेटवरुन अंदाज लावला जाऊ शकतो की, मुकेश अंबानी यांच्या ताफ्याचा पाठलाग करण्यात आला असेल. अन्यथा कारचा नंबर मॅच होणे सोपे नाही. गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले आहेत की, गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहे.

200 मीटर दूर उभी होती संशयित कार, जिलेटिनच्या 20 कांड्या आढळल्या
मुकेश यांचे घर एंटीलियाच्या जवळपास 200 मीटर अंतरावर एक संशयित SUV वरुन गुरुवारी जिलेटिनच्या 20 कांड्या जप्त करण्यात आल्या होत्या. तपासात हा कारचा नंबर बनावट असल्याचे समोर आले. पोलिसांनुसार, एंटीलियामध्ये बुधवारी रात्री जवळपास 1 वाजता SUV उभी करण्यात आली होती. येथे 2 गाड्या दिसल्या होत्या. यामध्ये एक इनोवाचाही समावेश होता. या गाडीचा ड्रायव्हर SUV येथेच पार्क करुन गेला होता. पोलिस आता या इनोवा आणि त्याच्या ड्रायव्हरचा शोध घेत आहेत.

मुकेश अंबानी यांच्या घराची सुरक्षा वाढली
या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी मुकेश अंबानी यांच्या घराभोवती सुरक्षा कडक केली आहे. मुकेश अंबानींकडे आधीपासूनच Z+ सुरक्षा आहे. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी CRPF कडे सोपवण्यात आली आहे. याशिवाय मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबानी यांना Y श्रेणीची सुरक्षा मिळाली आहे.

बातम्या आणखी आहेत...