आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुःखद घटना:मुंबईमध्ये मकर संक्रातींच्या निमित्ताने पतंग उडवताना शेणात पडला 10 वर्षांचा मुलगा, श्वास गुदमरुन मृत्यू

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पाहूनही वाचवू शकले नाही मुलाचे प्राण

मुंबईच्या कांदिवली परिसरात मकर संक्रांतीदरम्यान पतंग उडवताना एक 10 वर्षांचा चिमुरडा शेणामध्ये फसला आणि त्यात गुदमरुन त्याचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनुसार मुलगा चुकून शेणाच्या खड्ड्यात पडला होता आणि त्यात अडकल्याने त्याचा मृत्यू झाला.

मुलाचे नाव दुर्वेश जाधव असे आहे. तो पाचवी वर्गात शिकत होता. दुर्वेश एकुलता एक होता. या प्रकरणी सध्या कांदिवली पोलिस स्टेशनमध्ये ADR (अॅक्सीडेंटल टेथ रिपोर्ट) दाखल करण्यात आला आहे आणि जर आवश्यक असेल तर तपासानुसार बेजबाबदारपणाचे प्रकरण दाखल केले जाऊ शकते.

पाहूनही वाचवू शकले नाही मुलाचे प्राण
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुर्वेश शंकर पाडा परिसरातील एका तबेल्याजवळ खेळत होता. खेळत असताना त्याला तबेल्याच्या बाहेरच्या मैदानावर एक पतंग दिसला. पतंग उचलण्यासाठी दुर्वेश पोहोचताच तो शेणाच्या ढिगाऱ्यात बुडाला. तबेल्या शेजारी इमारतीचे काम करत असलेल्या काही लोकांना मुलाला शेणात अडकलेले पाहिले आणि दुसऱ्यांना अलर्ट केले. पण कुणीही तिथे प्रवेश करु शकत नव्हते. कारण ते धोकादायक होते. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिस आणि अग्निशमन दलालाही आत जाता आले नाही.

क्रेनच्या मदतीने मुलाला काढले बाहेर
दुर्वेश पूर्णपणे शेणामध्ये अडकला होता. काम सुरू असलेल्या इमारतीची क्रेन आणि श्रमिकांच्या मदतीने दुर्वेशला कसेतरी बाहेर काढण्यात आले. त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. कांदिवली पोलिस आता या प्रकरणी तपास करत आहे.

बातम्या आणखी आहेत...