आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी मुंबईत पावणे एमआयडीसीमधील केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आग इतकी भीषण होती की, यात तब्बल 9 कंपन्यांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. वेस्ट क्लाय पॉलिकॅब नावाच्या कंपनीत ही आग लागली असून या आगीमध्ये अनेक कामगार अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अग्निशामक दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
9 कंपन्या जळून खाक
खबरदारी म्हणून बाजूच्या कंपन्या खाली करण्यात आल्या असून सर्व कामगारांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. दरम्यान ही आग आता शेजारील 9 कंपन्यामध्ये पसरली असून अग्निशमन दलाकडून शेजारच्या कंपन्यांना आग लागू नये म्हणून कुलिंग प्रोसेस सुरू करण्यात आली आहे. यातील 9 कंपन्या जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे.
आगीवर नियंत्रण आणण्यास अपयश
या परिसरातील कंपन्यामध्ये ज्वलनशील पदार्थ असल्यामुळे आगीवर नियंत्रण आणण्यास अडचणी येत आहेत, अशी माहिती अग्निशामक दलाने दिली आहे. एमआयडीसी फायर ब्रिगेडसहित, नवी मुंबई, ठाणे, कल्याण आणि डोंबिवली येथून अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून त्यांच्याकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
खाजगी कंपन्याकडून फोम देखील मागवण्यात आले आहेत. सुरूवातील रबर कंपनीत लागलेली आग हळूहळू वाढत गेली. या आगीमुळे 9 कंपन्याना भस्मसात झाल्या आहेत. तरीसुद्धा आगी विझविण्यात यश आले नाहीये. केमिकल कंपनी असल्याने आग भीषण होत चालली आहे. या आगीमुळे आकाशात धुराचे लोट पसरलेले आपल्याला पहायला मिळत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.