आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागुन्हे शाखेने एक कास्टिंग काउच रॅकेटचा पर्दाफाश करत तीन लोकांना अटक केली आहे. हे लोक स्ट्रग्लिंग मॉडल आणि अभिनेत्रींना आपल्या जाळ्यात अडकवत होते आणि नंतर त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करुन घेत होते. यांच्या ताब्यातून 8 मॉडल, स्ट्रगलिंग अभिनेत्रींना मुक्त केले आहे. सोडवलेल्या महिलांना आणि आरोपींना आज कोर्टात हजर केले जाईल.
मुंबई क्राइम ब्रांचच्या क्रिमिनल इंटेलिजेंस यूनिट (CIU)चे एपीआय सचिन वेज यांनी सांगितले की, त्यांना सूचना मिळाली होती की, प्रेम नावाची एक व्यक्ती जी एक कास्टिंग दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माताही आहे. ती मॉडल आणि स्ट्रगल करणाऱ्या अभिनेत्रींना पहिले आपल्या जाळ्यात ओढत होती आणि नंतर त्यांना ब्लॅकमेल करुन वेश्या बनण्यास भाग पाडत होती.
अकाउंटमध्ये 3 लाख जमा करुन आरोपींपर्यंत पोहोचले पोलिस
सचिन वेजच्या म्हणण्यानुसार, वेश्याव्यवसाय रॅकेटसाठी ग्राहकांना कित्येक संकेतस्थळांमार्फत बोलावले जात होते. माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला आणि बनावट ग्राहक बनून दोन लाख रुपये प्रेमच्या खात्यात जमा केले. त्यानंतर 19 जानेवारी रोजी सीआययूने जुहू येथील रमाडा प्लाझा हॉटेलमध्ये सोशल सर्व्हिसेस (SS) शाखेसह सापळा रचला आणि एका महिलेसोबत प्रेमला पकडले.
मॉडेलिंग, वेब सीरीज आणि मालिकांसाठी काही असाइनमेंट दिल्या
ही महिला कोलकाताची रहिवासी असल्याचे तपासात उघड झाले आहे. अभिनेत्री बनवण्याच्या नावाखाली तिला या रॅकेटमध्ये टाकले होते. या दोघांकडून माहिती घेतल्यानंतर पोलिसांनी मुंबईच्या विविध भागातील 8 मुलींची सुटका केली. यापैकी काही मुलींनी मॉडेलिंग, वेब सीरीज आणि मालिकांमध्ये काही असाईनमेंट केल्या होत्या. मुली म्हणाल्या की आरोपी त्यांना काम देण्याच्या नावाखाली 'तडजोड' करायला सांगायचा.
5.5 लाख रोख आणि 15 स्मार्टफोन जप्त केले
प्रेम व इतर दोन महिलांविरूद्ध मुंबईतील जुहू पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहिता (आयपीसी) च्या कलम 120बी, 370, 34 सह अनैतिक तस्करी कायद्यान्वये (पीआयटीए) गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून 5,59,000 रुपयांची रोकड, 15 स्मार्टफोन आणि डस्टर कार जप्त करण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.