आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साबणाच्या स्वरूपात ड्रग्ज:मुंबई विमानतळावर 33.60 कोटी रुपयांचे 3.36 किलो कोकेन जप्त

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राची राजधानी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर विभागाने (DRI) मोठी कारवाई केली आहे. डीआरआय अधिकाऱ्यांनी मुंबई विमानतळावर आदीदी अबाबाहून आलेल्या एका भारतीय प्रवाशाकडून 33.60 कोटी रुपयांचे कोकेन जप्त केले आहे. त्याने 3.36 किलो ड्रग्ज साबणाच्या स्वरूपात लपवून आणले होते. डीआरआय अधिकाऱ्यांना या प्रवाशाचा संशय आला. यानंतर त्याची तपासणी करण्यात आली. सामानाची झडती घेतली असता अधिकाऱ्यांच्या हातात एक साबण आला. साबणाचा शोध घेतला असता सत्य बाहेर आले.

प्रत्यक्षात झडतीदरम्यान अधिकाऱ्यांना एक बॉक्स आढळून आला. हा बॉक्स साबणाचा होता. या कव्हरमध्ये अधिकाऱ्यांना पांढऱ्या रंगाचा साबण दिसला. त्याची अधिक नीट तपासणी केली असता अधिकाऱ्यांच्या हाताला वॅक्स चिकटू लागले. यानंतर अधिकाऱ्यांनी साबण घासण्यास सुरुवात केली. वॅक्स घासल्यानंतर आत साबणासारखा तुकडा दिसला. पण तो साबण नव्हता.

अशाप्रकारे 33 कोटी 60 लाख किमतीचे 3360 ग्रॅम कोकेन जप्त
सखोल तपास केला असता तो साबण नसून कोकेन असल्याचे आढळून आले. कोकेनच्या या साठ्याचे वजन केल्यानंतर ते 3360 ग्रॅम असल्याचे निष्पन्न झाले. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत अंदाजे 33 कोटी 60 लाख रुपये आहे. आदीदी अबाबाहून आलेल्या या भारतीय प्रवाशाला डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे.

सर्वात वर कव्हर, कव्हरच्या आत वॅक्स, वॅक्सच्या आत साबण...नाही कोकेन

बातम्या आणखी आहेत...