आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सायबर गुन्हेगारी:महिलांवरील अत्याचाराला उत्तेजन देणाऱ्या पोस्ट खपवून घेणार नाही, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला इशारा

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • टिकटॉकवर अ‍ॅसिड हल्ला आणि बलात्काराला प्रोत्साहन देणारे व्हिडिओ समोर आले

सोशल मीडियावरून महिला अत्याचारांना उत्तेजन देणारे व्हिडिओ किंवा पोस्ट व्हायरल करणे खपवून घेणार नाही. अंशांवर कठोर कारवाई करण्यात येईल, सायबर क्राइम विभाग सोशल मीडियावर लक्ष ठेऊन आहेत, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

सोशल मीडियावरूनच महिलांवरील अत्याचाराला प्रोत्साहन देणारे व्हिडिओ आणि पोस्ट व्हायरल होत आहेत. त्याची गृहमंत्री देशमुख यांनी गंभीर दखल घेतली आहे. अशा पोस्ट टाकणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून सायबर क्राइमच्या गुन्ह्यात वाढ झाली आहे. व्हॉट्सअॅप, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि टिकटॉकवरून महिलांवरील अत्याचाराला उत्तेजन देणारे व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत. अफवा पसरवल्या जात असून धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्टही टाकण्यात येत आहेत. हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही असे देशमुख यांनी या वेळी सांगितले आहे.

४१० गुन्हे दाखल, २१३ जणांना अटक

सायबर गुन्ह्यांप्रकरणी आतापर्यंत ४१० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी २१३ जणांना अटक करण्यात आली आहे. असे सांगतानाच सोशल मीडियावर महिलांवरील अत्याचाराला प्रोत्साहन देणारे, धार्मिक तेढ निर्माण करणारे व्हिडिओ आणि अफवा पसरवणाऱ्या पोस्ट टाकू नका. तुमच्या प्रत्येक कृतीकडे महाराष्ट्र सायबर क्राइम विभाग लक्ष ठेवून आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

बातम्या आणखी आहेत...