आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबईतील वांद्रे वरळी सी लिंकवर घारीला वाचवण्यासाठी कारमधून उतरलेल्या दोघांना टॅक्सीने धडक दिली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
घारीला वाचवताना गमावला जीव
ही घटना 30 मे रोजी घडली. अमर मनीष जरीवाला (४३) हे त्यांच्या कारमधून सी लिंकवरून जात होते. ड्रायव्हर गाडी चालवत होता. अचानक एक घार त्यांच्या कारला धडकून खाली पडली. मनीषने लगेच गाडी थांबायला सांगितली आणि खाली उतरून घारीला वाचवण्यासाठी पुढे निघाले. त्यांच्या मागे चालकही खाली उतरला.
त्याचवेळी मागून येणारी एक टॅक्सी त्यांना रस्त्यावर पाहूनही थांबली नाही. टॅक्सी चालकाने दोघांनाही धडक दिली आणि निघून गेला. टॅक्सीने धडक दिल्यानंतर मनीष आणि ड्रायव्हर हवेत उडाले आणि रस्त्यावर पडले. या घटनेत अमर मनीष जरीवाला यांचा जागीच मृत्यू झाला. चालक श्याम सुंदर कामत हाही जखमी झाला होता परंतु उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला.
कुटुंबीय टॅक्सी ड्रायव्हरवर गुन्हा दाखल करू इच्छित नाहीत
अमरच्या कुटुंबीयांना टॅक्सी चालकावर कोणतीही कायदेशीर कारवाई करायची नाही. असे असतानाही वरळी पोलिसांनी टॅक्सी चालकावर गुन्हा दाखल केला आहे.
कुटुंबीयांनी सांगितले की अमर हा प्राणी आणि पक्ष्यांबाबत खूप संवेदनशील होता. त्याची संवेदनशीलता त्याच्या मृत्यूचे कारण ठरली. अमर दक्षिण मुंबईतील नेपेंसी रोडवर असलेल्या एका सोसायटीत राहत होता. काही कामानिमित्त मालाडला जात असताना त्यांच्यासोबत हा अपघात झाला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.