आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबै बँक प्रकरण:विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांना पोलिसांची नोटीस, 11 एप्रिलला पुन्हा चौकशी होणार

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

गेली काही दिवस विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे. मुंबै बँक मजूर प्रकरणात पोलिसांनी दरेकरांना नोटीस बजावली आहे. 11 एप्रिलला पुन्हा त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे पोलिसांनी सांगितले आहे. काही दिवसांपूर्वीच दरेकरांना मुंबई पोलिसांनी नोटीस पाठवली होती. यानंतर आता पुन्हा दरेकरांना दुसरी नोटीस बजावण्यात आली आहे.

यावर बोलताना कर नाही त्याला डर कशाला अशा शब्दांत दरेकरांनी प्रतिक्रिया देत मी चौकशीला जाणार असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान दुसरीकडे भाजप नेते किरीट सोमय्या यांनाही कालच पोलिसांनी चौकशीसाठी समन्स बजावला होता. आयएनएस विक्रांत प्रकरणात किरीट सोमय्या यांच्याविरोधात तक्रार दाखल झाली आहे. त्यामुळे भाजपचे दोन नेते आता मुंबई पोलिसांच्या चौकशीच्या फेऱ्यात आहेत.

भाजपच्या दोन नेत्यांची पोलिसांकडून चौकशी

राज्यात पोलिस चौकशी, आयकर आणि ईडीच्या धाडी यावरून राजकारण तापत आहे. अधिवेशनाच्या आधी प्रवीण दरेकर यांच्यावर आरोप झाले. यावेळी मला मुद्दाम अडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप दरेकरांनी केला होता. राज्यातील पोलिस यंत्रणाचा आरोप राज्य सरकार चुकीच्या पद्धतीने करत आहे. असेही दरेकर यांनी म्हटले आहे.

याच मुद्द्यांवर सोमय्या मविआ सरकारवर रोज टीका करत असतात. तर राज्यातील सत्ताधारी नेते ईडी, आयकर या केंद्रीय यंत्रणाचा भाजपकडून गैरवापर सुरू आहे. असा आरोप केला जात आहे. राऊतांचे आणि सोमय्यांचे आरोप-प्रत्यारोप राज्यातील जनतेला नवे राहिलेले नाही. मात्र यात आता भाजपच्या दोन नेत्यांची पोलिसांकडून चौकशी सुरू झाली आहे.

कालचा हल्ला राऊतांनी नियोजनबद्ध केलाय? -दरेकर
दरेकर यांनी आता संजय राऊत यांच्यावर पलटवार केला आहे. यावर बोलताना कालचा हल्ला हा संजय राऊतांनीच नियोजनबद्ध केलाय का ? असा खोचक सवाल प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला आहे. आम्ही एसटी कर्मचाऱ्यांसोबत आहोत, मात्र कालच्या घटनेचे समर्थन करत नाही असे दरेकरांनी म्हटले आहे.