आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईमध्ये मोठा अपघात टळला:ड्रायव्हरला अचानक आला हार्टअटॅक, सिग्नल पोल तोडत दुकानात शिरली बस; 20 प्रवासी थोडक्यात बचावले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चेंबूर पोलिस स्टेशनसमोरर बसंत पार्कजवळ होता-होता टळला अपघात
  • बस ड्रायव्हरला घाटकोपरच्या राजावाडी हॉस्पिटलमध्ये केले दाखल, आता तब्येत चांगली

ड्रायव्हरला अचानक हार्टअटॅक आल्यानंतर चेंबूर परिसरात बेस्टची बस दुर्घटनाग्रस्त झाली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. हा अपघात झाला तेव्हा बसमध्ये 20 पेक्षा जास्त प्रवासी होते.

हा अपघात मंगळवारी दुपारी चेंपबूर पोलिस स्टेशनसमोरील बसंत पार्कजवळ दुपारी 12 वाजेच्या जवळपास झाला. हरिदास पाटील नावाच्या बस ड्रायव्हरला हार्टअटॅक आल्यामुळे बेस्टची बस ट्रॅफिक सिग्नलला धडक घेत एका दुकानात घुसली. यामध्ये बसच्या एका भागाची तोडफोड झाली. हरिदास पाटीलचा घाटकोपरच्या राजावाडी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांची स्थिती आता चांगली असल्याचे सांगितले जात आहे.

अशी झाली दुर्घटना
बीएमसीकडून जारी करण्यात आलेल्या जबाबात म्हटले आहे की, बस नंबर 381 सकाळी 10.30 वाजता घाटकोपर स्टेशन पूर्वपासून निघाली होती. जेव्हा ही बस चेंबूरच्या टाटा पावर स्टेशनजवळ पोहोचली, तेव्हा अचानक बस चालकाला हार्ट अटॅक आला. ज्यानंतर त्याचा बसवरील तापा सुटला आणि बस एका भाजीच्या दुकानात घुसली.

बातम्या आणखी आहेत...