आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राम मंदिरावरुन वाद:मुंबईत शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते आमने-सामने आल्याने तुफान राडा, शिवसेना भवनासमोर कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पोलिसांनी भाजपा जनता युवा मोर्चाच्या जवळपास 40 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असल्याची माहिती आहे.

राम मंदिराच्या मुद्द्यावरुन शिवसेना विरुद्ध भाजप असे चित्र मुंबईत पाहायला मिळत आहे. शिवसेना आणि भाजपा कार्यकर्ते आमने-सामने आल्याने तुफान राडा झाला आहे. शिवसेना भवनसमोर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जबरदस्त हाणामारी झाली. राम मंदिरावरुन शिवसेनेकडून करण्यात आलेल्या टीकेमुळे हा वाद झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान हाणामारीमुळे परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली असून पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

मुंबई भाजप युवा मोर्चाने शिवसेनेविरोधात थेट शिवसेना भवनावर मोर्चा काढण्याचे ठरवले होते. मात्र, शिवसेना भवनापासून काही अंतरावरच पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना अडवले. या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलिस स्टेशनमध्ये नेले. मात्र, दुसरीकडे काही भाजप कार्यकर्त्यांना माहराण झाली असल्याचेही दिसले. शिवसैनिकांनी भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनांही काठीने मारहाण केल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.

राम मंदिरावरुन शिवसेनेने केलेल्या टीकेमुळे हा वाद झाला असल्याची माहिती आहे. दरम्यान हाणामारीमुळे परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली झाली होती. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन हा वाद मिटवण्याच प्रयत्न केला. अयोध्येमध्ये जमिनीचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला होता. यामुळे भाजप जनता युवा मोर्चाने शिवसेना भवनाबाहेर आंदोलन केले. यावेळी भाजप आणि शिवसेना कार्यकर्ते आमने-सामने आल्याने हा वाद शिगेला पोहोचला. पोलिसांनी भाजपा जनता युवा मोर्चाच्या जवळपास 40 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असल्याची माहिती आहे.

बातम्या आणखी आहेत...