आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालकांमध्ये ब्लॅक फंगस:ब्लॅक फंगसची लागण झाल्यामुळे काढावा लागला 3 मुलांचा डोळा, मुंबईतील एका 16 वर्षीय मुलीच्या पोटात ब्लॅक फंगस आढळला

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मीडिया रिपोर्टमध्ये दावा करण्यात येतोय की, कोरोनातून ठीक झाल्यानंतर ब्लॅक फंगसची लागण झाल्यामुळे तीन मुलांचे डोळे काढावे लागले आहेत. ही मुले मुंबईतील दोन खासगी रुग्णालयांमध्ये दाखल होती. त्या तिघांचे वय 4, 6 आणि 14 वर्षे आहे. विशेष म्हणजे 4 आणि 6 वर्षांच्या मुलांमध्ये डायबिटीजची कोणतीच लक्षणे नव्हती.

आतापर्यंत ब्लॅक फंगसबाबत दावा केला जात होता की, फक्त डायबिटीजच्या रुग्णांना याचा धोका असतो. पण, या दोन मुलांना ब्लॅक फंगसची लागण झाल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. या तीन चिमुकल्यांशिवय एका 16 वर्षीय मुलीलाही ब्लॅक फंगसची लागण झाली. डॉक्टरांना तिच्या पोटात फंगस आढळला. पण, उपचारानंतर तो ठीक करण्यात आला.

14 वर्षीय मुलगी गंभीर
फोर्टिस हॉस्पिटलमधील सीनियर पीडियाट्रीशियन डॉ. जेसल सेठ यांनी सांगितले की, यावर्षी त्यांच्याकडे ब्लॅक फंगसचे 2 रुग्ण आले. दोघेही अल्पवयीन होते. 14 वर्षीय मुलीला डायबिटीज आहे, सध्या तिची प्रकृती नाजुक आहे. हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर 48 तासातच तिच्यात ब्लॅक फंगसची लक्षणे दिसली. फंगस तिच्या नाकापर्यंत पोहचला होता. आम्ही तिच्यावर सहा आठवडे उपचार केला, पण दुर्दैवाने तिचा डोळा वाचवू शकलो नाहीत. याशिवाय, 4 आणि 6 वर्षांच्या चिमुकल्यांचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांना त्यांचा डोळा काढावा लागलाय.

बातम्या आणखी आहेत...