आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

26/11 च्या स्मृतीदिनापूर्वी:मुंबईला बॉम्बने उडवण्याची दिली धमकी; कॉलरने दुबईतून केला होता फोन, मनोरुग्ण आहे व्यक्ती

25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शनिवारी संध्याकाळी उशिरा देशाची आर्थिक राजधानी मुंबई बॉम्बने हादरण्याची धमकी देण्यात आली होती. 26/11 दहशतवादी हल्ल्याच्या स्मृतीदिनाच्या 13 दिवस आधी फोनवरून ही धमकी देण्यात आली होती. मात्र, रात्री उशिरा पोलिसांनी फोन करणाऱ्याची ओळख पटवली.

जीआरपी मुंबईच्या म्हणण्यानुसार, कॉलर त्याच्या आईसोबत दुबईत राहतो आणि मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहे. गेल्या आठवड्यातही या व्यक्तीने गुजरातमधील गांधीधाम येथील एका पोलिस अधिकाऱ्याला फोनवरून अशीच माहिती दिली होती. पोलिसांनी या व्यक्तीच्या कुटुंबीयांशी बोलल्यानंतर याला दुजोरा दिला आहे.

मुंबईच्या वांद्रे स्थानकावर रेल्वे पोलिसांना फोन आला
मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानकावर शनिवारी एका अज्ञात व्यक्तीने रेल्वे पोलिसांना फोन केला. फोनवर मानसिकदृष्ट्या अस्वस्थ व्यक्तीने अख्खे शहर बॉम्बने उडवण्याविषयी सांगितले. या फोन कॉलनंतर पोलिस दल सतर्क झाले असून सर्वच ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. विशेषतः सर्व रेल्वे स्थानकांवर सतर्कता ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय सर्व संबंधित सुरक्षा यंत्रणांनाही रेल्वेकडून धमकीच्या कॉलची माहिती देण्यात आली आहे.

रेल्वे पोलिस आयुक्त म्हणाले - घाबरण्याची गरज नाही
मुंबईचे रेल्वे पोलिस आयुक्त कैसर खालिद यांनी स्वत: सर्वांना धमकीच्या कॉलची माहिती दिली. खालिद यांनी ट्विट केले की, मुंबईतील संभाव्य बॉम्ब हल्ल्याची माहिती आज वांद्रे आरपीएसला टेलीफोनवरुन मिळाली आहे. कॉलरशी संपर्क साधण्यात आला आहे. सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सर्व सहाय्यक संस्थांना कळवण्यात आले आहे. आम्ही या प्रकरणाची चौकशी करत आहोत. कोणालाही घाबरण्याची गरज नाही.

मुंबई हल्ल्याची तारीख जवळ येण्यापूर्वीच दक्षता
26 नोव्हेंबर 2008 च्या मुंबईतील दहशतवादी हल्ल्याची तारीख जवळ येण्यापूर्वीच सर्वत्र सतर्कतेचे वातावरण आहे. या दक्षतेदरम्यान पोलिस बॉम्बस्फोटाची धमकी अत्यंत गांभीर्याने घेत असून प्रत्येक अँगलने तपास केला जात आहे.

दोन दिवसांपूर्वी अंबाला-चंदीगड स्टेशन उडवून देण्याची धमकी मिळाली होती
दोन दिवसांपूर्वी हरियाणातील अंबाला आणि चंदीगड रेल्वे स्थानकांनाही बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती. लष्कर-ए-तोयबाचा सदस्य असल्याचा दावा करणाऱ्या मानसिक रोग्याने 26/11 च्या स्मृतिदिनीच बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देणारे पत्र अंबाला रेल्वे डीआरएमला पाठवले होते.

दोन आठवड्यांपूर्वी मेरठसह 9 स्थानके उडवण्याचे मिळाले होते पत्र
दोन आठवड्यांपूर्वी मेरठसह 9 रेल्वे स्थानके उडवून देण्याची धमकी देणारे पत्रही पाठवण्यात आले होते. या पत्रात लष्कर-ए-तोयबाच्या बाजूने धमकी देताना मुंबईवरील 26/11 हल्ल्याचा उल्लेख करण्यात आला होता. या पत्राची उत्तर प्रदेश पोलिसांची एटीएस चौकशी करत आहे.

बातम्या आणखी आहेत...