आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाचा परिणाम:मुंबईत समुद्रात, तलावांमध्ये छठ पूजा करण्यावर बंदी, बीएमसीने कोरोनामुळे घेतला महत्त्वाचा निर्णय

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनामुळे हा निर्णय घेतला असल्याचे वृत्त आहे. छठ पर्व 18 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबरपर्यंत साजरा केला जातो.

मुंबईमध्ये सार्वजनिक जलाशयांमध्ये छठ पूजेवर बंदी घालण्यात आली आहे. मुंबईमध्ये बीच, तलाव आणि किनाऱ्यांवर छठ पूजा करता येणार नाही. बीएमसीने हा निर्णय घेतला आहे. बीएमसीने यासंबंधीत आदेशही जारी केला आहे. यासोबतच ठाणे पोलिसांनीही छठ पूजा सार्वजनिक ठिकाणी न करता घरीच करण्याचे निर्देश दिले आहेत.

कोरोनामुळे हा निर्णय घेतला असल्याचे वृत्त आहे. छठ पर्व 18 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबरपर्यंत साजरा केला जातो. यापूर्वीच मुंबईमध्ये सार्वजनिक जलाशयांच्या आजुबाजूला छठ पूजा करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. कोरोना व्हायरसचा वाढता धोका पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे.

केवळ मुंबईच नाही तर झारखंडनेही हा निर्णय घेतला होता. झारखंड सरकारने सार्वजनिक जलाशयांच्या आजुबाजूला छठ पूजा करण्यास बंदी घातली होती. कोरोनामुळे हा निर्णय घेण्यात आला होता. झारखंड सरकारच्या या निर्णयाचा भाजपने विरोध केला. यानंतर सीएम सेमंत सोरेन स्वतः समोर आले आणि म्हणाले की, बंदी हटवण्यात येत आहे, मात्र जलाशयांमध्ये पूजा करताना सर्वांना कोरोना प्रोटोकॉलचे पालन करावे लागेल. मास्क लावावे लागेल.

बातम्या आणखी आहेत...