आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबईमध्ये ड्रग्स सप्लायर ताब्यात:कॅब ड्रायव्हर आणि फूड डिलीव्हरी बॉय बनून करत होता ड्रग्स सप्लाय, अनेक टीव्ही आणि फॅशन इंडस्ट्रीशी संबंधीत लोक होते कस्टमर

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • त्याच्या मोबाइलमध्ये व्हॉट्सअॅप चॅटिंगमध्ये काही फिल्मी शब्द लिहिलेले सापडले
  • मुंबई पोलिस त्याच्या मोबाइलचा संपूर्ण सीडीआर आणि व्हॉट्सअॅप चॅटींग तपासत आहे

एकीकडे देशातील टॉप तीन अभिनेत्रींची नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोकडून चौकशी सुरू आहे. तर दुसरीकडे मुंबई क्राइम ब्रांचने एका अशा वय्क्तीला अटक केली आहे जो एक मोठी फूड डिलीव्हरी कंपनी आणि कॅब कंपनीचा एजेंट बनून ड्रग्स सप्लाय करायचा. आरोपीजवळ 5 लाख 55 हजार रुपये किंमतीचे मेफेड्रोन ड्रग्स सापडले आहेत.

मुंबई क्राइम ब्रांचचे डीसीपी एकबर पठान यांनी सांगितले की, आण्ही यासंबंधीच 40 वर्षांच्या उस्मान शेख याला जोगेश्वरी पश्चिम या भागातून अटक केली आहे. चौकशी दरम्यान उस्मानने सांगितले की तो मॉडेलिंग आणि टीव्ही मालिकांच्या जगात स्ट्रगल करत असलेल्या लोकांना ड्रग्स पोहोचवायचा. याचा पुरावा त्याच्या मोबाइल फोनवरून गुन्हे शाखेकडेही सापडला आहे. त्याच्या मोबाईल व्हॉट्सअॅप चॅटिंगवर असे काही फिल्मी शब्द सापडले आहेत, ज्याचे दुवे बॉलीवूडशीही असल्याचे दिसत आहे. मात्र, गुन्हे शाखेने कोणतीही नावे जाहीर केली नाहीत.

घरा-घरात अशी पोहोचवत होता ड्रग्स
मुंबई पोलिस त्याच्या मोबाइलचा सर्व सीडीआर आणि व्हॉट्सअॅप चॅटिंग तपासत आहे. फूड डिलिव्हरी कंपनी आणि कॅब कंपनीचा ड्रायव्हर म्हणून काम करताना शेख ड्रग्सच्या धंद्यात गुंतल्याचेही तपासात समोर आले आहे. तो आपल्या गाडीत मादक पदार्थ पुरवठा करत असे आणि फूड डिलिव्हरी बॉय बनून ती ग्राहकांना ड्रग्स पोहोचवत होता. तो फोन, टेलिग्रामवरून ऑर्डर घेत असे. तपासात समोर आले की, तो ड्रग्स पॅसेंजरच्या सीट खाली लपवायचा, यामुळे पकडले गेल्यावर सर्व दोष प्रवाशांवर आला असता.

लॉकडाउनमध्ये सर्वात जास्त ड्रग्स सप्लाय केले
मुंबई क्राम ब्रांच्या तपासात समोर आले आहे की, कोरोना संक्रमणाच्या काळात गाडी चालवण्यासाठी त्याने पास काढला होता. सर्वात जास्त ड्रग्स याच काळात सप्लाय करण्यात आल्याचे बोलले जात आहे. आज त्याला स्थानिक कोर्टात हजर करुन पोलिस 3-4 दिवसांची रिमांड मागू शकता. मुंबई पोलिसांनी हे देखील स्पष्टीकरण दिले आहे की, ज्या नामांकित कंपन्यांचा प्रतिनिधी म्हणून तो काम करत होता. त्याचा या ड्रग्स केसशी काहीही संबंध नाही.

रियाच्या केसनंतर डबल-ट्रिपल केले होते रेट
उस्मान शेखने सांगितले की, ड्रग्समध्ये रिया चक्रवर्ती आणि अनेक ड्रग्स पॅडलर्सच्या अटकेनंतर मुंबईमध्ये ड्रग्सची विक्री खूप टाइट आहे. अशा वेळी त्याने ड्रग्सचे भाव दुप्पट आणि तिप्पटही केले होते. कारण त्याला माहिती होते की, जे ड्रग्स अॅडिक्ट आहेत, ते कोणत्याही किंमतीत ड्रग्स घेतली.

बातम्या आणखी आहेत...