आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका कॉलने उडवली मुंबई पोलिसांची झोप:फोन करणाऱ्याने तीन रेल्वे स्टेशन आणि अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यात बॉम्ब ठेवण्याची दिली धमकी, रात्रभर सुरु होता तपास; सुरक्षा वाढवली

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • फोन करणाऱ्याचे स्थान सापडले आहे, परंतु त्याचा अद्याप शोध लागला नाही.

रात्री उशीरा अज्ञात व्यक्तीच्या आलेल्या फोन कॉलनंतर मुंबई पोलिस आणि बॉम्ब डिस्पेजल स्क्वाडची झोप उडाली आहे. त्याने आर्थिक राजधानीत फोन करून चार बॉम्ब ठेवण्याचा इशारा दिला होता. फोन करणाऱ्याने सांगितले की, मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशन, भायखळा स्टेशन, दादर रेल्वे स्टेशन आणि जुहू येथील अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यावर बॉम्ब ठेवण्यात आले होते. दरम्यान हा कॉल बनावट निघाला आणि येथून काहीही प्राप्त झाले नाही.

मुंबई पोलिसांनी शनिवारी सांगितले की, पोलिस नियंत्रण कक्षाला काल रात्री फोन आला, ज्यामध्ये मुंबईत चार ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आल्याची धमकी देण्यात आली. सध्या या सर्व ठिकाणांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फोन करणाऱ्याचे स्थान सापडले आहे, परंतु त्याचा अद्याप शोध लागला नाही.

पोलिस दलाचा मोठा बंदोबस्त
जुहू पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत माने म्हणाले, 'रात्री 8.53 वाजता फोन आल्यानंतर शासकीय रेल्वे पोलिस (GRP), रेल्वे संरक्षण दल (RPF) तसेच बॉम्ब निकामी पथक, श्वान पथक आणि स्थानिक पोलिस कर्मचारी या ठिकाणी पोहोचले आणि ऑपरेशन चालवले. त्यांनी सांगितले की, 'आतापर्यंत या ठिकाणी संशयास्पद काहीही आढळले नाही परंतु तेथे मोठ्या प्रमाणात पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत'

बातम्या आणखी आहेत...