आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत भीषण आग:बोरवली भागातील एका 7 मजली इमारतीला भीषण आग, एक जखमी, अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल

मुंबई19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गॅस लिकमुळे आग लागल्याची शक्यता

मुंबईतील बोरवली भागातील एका इमारतीला भीषण आग लागली आहे. ही आग वर्दळीच्या ठिकाणी असल्यामुळे अग्निशमन दलाचे जवान अलर्टवर होते. घटनेची माहिती मिळताच जवळील अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहे. या घटनेत एक कर्मचारी जखमी झाला असून उपचारासाठी त्याला जवळील उपचार केंद्रात दाखल करण्यात आले आहे.

गॅस लिकमुळे आग लागल्याची शक्यता
बोरवली पोलिस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही आग बोरवलीमधील गजानन सोसायटीच्या 7 व्या मजल्यावर लागली आहे. आगीमुळे सोसायटीत राहणार्‍या सर्व लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. ही आग कशामुळे लागली याबाबत अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही. परंतु, स्वयंपाक खोलीत गॅस लिक झाल्यामुळे ही आग लागली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

इमारतीतून निघणारा धूर लांबून दिसतो. सध्या आग आटोक्यात आणण्यात आली आहे.
इमारतीतून निघणारा धूर लांबून दिसतो. सध्या आग आटोक्यात आणण्यात आली आहे.

सर्व लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, आगीमुळे सोसायटीत अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. या दुर्घटनेत एक कर्मचारी जखमी झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...