आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इमारतीला आग:मुंबईच्या बोरीवली परिसरातील इमारतीला आग, काही लोकं अडकल्याची माहिती; आगीचे कार्य अद्याप अस्पष्ट

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईच्या बोरिवली परिसरातील एका इमारतीला आग लागण्याची घटना घडली आहे. चिकूवाडीमधील पॅरेडाइज् या इमारतीच्या बाराव्या मजल्यावर आज दुपारी 12.40 दरम्यान अचानक आग लागली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून प्रयत्न सुरू आहेत.

बोरिवली पश्चिम चिकूवाडी परिसरातील पॅरेडाइज् नावाच्या इमारतीच्या बाराव्या मजल्यावर ही आग लागली आहे. इमारतींमधील बहुतांश लोकांना बाहेर काढण्यात आलं आहे. ही 24 मजली इमारत असून काही लोक अडकले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

दरम्यान, आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. विद्युत सर्किट, इलेक्ट्रीक उपकरण अथवा गॅस गळती झाल्याने ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. ही इमारत 24 मजल्यांची असल्याने धोका लक्षात घेऊन अग्निशमन दलाने तातडीने मतद आणि बचाव कार्य सुरू केले आहे.

बातम्या आणखी आहेत...