आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रशासनाच्या परवानगी शिवाय मुंबईतल्या समुद्रकिनाऱ्यावर बैलगाडी शर्यत घेण्यात आल्याचे समोर आले आहे. या शर्यतीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.
बैलगाडी शर्यतीवरची बंदी सर्वोच्च न्यायालयाने गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात उठवलीय. मात्र, त्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून परवानगी घेणे आवश्यक आहे, पण याचे पालन होताना दिसत नाही.
आरोपींचा शोध सुरू
मुंबईतल्या गोराई समुद्र किनाऱ्यावरही अशीच बैलगाडी शर्यत झाल्याचे समोर आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी सकाळी सहा वाजता ही शर्यत झाली. विशेष म्हणजे याची पोलिसांना पुसटशीही कल्पना नव्हती. या शर्यतीचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर पोलिस खडबडून जागे झाले. या प्रकरणी गोराई पोलिस ठाण्यात प्राणी क्रूरता कायदा, 1960 च्या कलम 11 अन्वये गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.
पोलिस होते अंधारात
मुंबईतल्या गोराई बीचवर बैलगाडी शर्यत रंगली. यावेळी शेकडो लोक उपस्थित होते. मात्र, तरीही पोलिसांना याचा थांगपत्ता नसल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा सारा प्रकार समोर आला. त्यानंतर आता पोलिसांनी आयोजकांचा शोध सुरू केल्याचे समजते. हे आयोजक पोलिसांच्या हाती कधी येणार हे पाहावे लागेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.